पोलीस ठाणे चिकलठाणा व औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात वृध्द महिला हेरून जबरी चोरी करणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

औरंगाबाद: पोलीस स्टेशन चिकलठाणा येथे दिनांक 07/12/2022 रोजी फिर्यादी नामे चंपाबाई धनसिंग बोहरा वय 58 वर्ष, व्यवसाय घरकाम व शेती रा. हिरापुर ता. जि. औरंगाबाद हिने तक्रार दिली कि, दिनांक 07/12/2022 रोजी 08.30 वाजता सुमारास फिर्यादी या हिरापुर फाटा येथे आल्या असता त्यांना अनोळखी इसमाने मी तुम्हाला सोडतो असे म्हणून मोटार सायकलवर लिप्ट देण्याचा बहाना करून नाथनगर येथील डोंगरात निर्जन ठिकाणी नेऊन फिर्यादीचे गळ्यातील कानातील 70,000/- रुपये किंमतीचे 10 ग्रॅम सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेऊन कानाला दुखापत करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या म्हणून पोलीस स्टेशन चिकलठाणा गुरनं. 478 / 2022 कलम 394,506 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करित असतांना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून व तांत्रिक विश्लेषणा आधारे खात्रीलायक माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा इसम नामे राहुल कडुबा पवार राबावरा ता. पुलंबी जि. औरंगाबाद याने केला आहे, त्यावरुन त्याचा शोध घेऊन त्यांस ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव राहुल कड्या पवार वय 30 वर्ष राबावरा ता. फुलंब्री जि.औरंगाबाद असे सांगीतले.

त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तसेच औरंगाबाद ग्रामीण जिल्हयातील पोलीस ठाणे करमाड, चिकलठाणा, फुलंब्री, पाचोड, शिऊर येथे वृध्द महिलांना हेरून मोटार सायकलवर लिप्ट देण्याचे बहाण्याने व रस्त्यावर व शेत वस्तीवर एकांतात गाठुन अशाच प्रकारचे जबरी चोरीचे इतर (15) गुन्हे दाखल आहे, तसेच अशा प्रकारचे गुन्हे सदर आरोपीने जालना जिल्हयात देखील केले आहेत. त्यासंदर्भान्वये त्याचेकडे विचारपुस चालु आहे. नमुद आरोपीचे ताब्यातून गुन्हा करतेवेळी वापरलेली मोटार सायकल व मोबाईल हँडसेट असा एकूण 60,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यांत आला असून नमूद आरोपीस सदर गुन्हयाचे पुढील तपास कामी पोलीस ठाणे चिकलठाणा यांचे ताब्यात देण्यांत आले असून पुढील तपास पोलीस ठाणे चिकलठाणा हे करित आहे.

सदरची कार्मगिरी श्री. मनिष कलवानीया, पोलीस अधीक्षक श्री. सुनिल लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रंगे, पोउपनि प्रदिप दुबे, पोह. लहू थोटे, संजय घुगे, नदिम शेख, कासम शेख, मपोह जनाबाई राठोड, मनिषा चौधरी, पोना विजय धुमाळ, दिपक सुरोशे, अशोक बाप, पोको/राहुल गायकवाड, ज्ञानेश्वर मेटे, आनंद घाटेश्वर, संजय तांदळे, योगेश तरमाळे, जिवन घोलप, कविता पवार, पदमा देवरे यांनी केली आहे

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट