ग्राहकांचे आधार कार्ड व इतर फिंगरप्रिंट बनावटीकरण करून 123 सिम कार्ड विक्री करणाऱ्या इसमास नायगांव स्टेशन मधुन अटक…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

बोरीवली :- CR no- 264/2023 U/S 419 420 465 467 471 34 IPC r/w 66(c) IT

सदर गुन्हयाची हकीकत अशी की,
यातील फिर्यादी श्री योगेश श्रीकृष्ण राजापूरकर वय 44 हे airtel या कंपनीत नोडल अधिकारी म्हणून काम करत असून त्यांना दिनांक 07/06/2023 रोजी डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन( डी ओ टी )यांच्याकडून मेल प्राप्त झाला की,कोतवाली पोलीस ठाणे, जिल्हा जोनपुर,उत्तर प्रदेश येथे स्थानिक पोलिसांनी एका कॉल सेंटर वर छापा टाकून कारवाई केली असता त्यामध्ये मुंबई येथील पॉईंट ऑफ सेल ओम साई मोबाईल,दहिसर येथून 123 सिमकार्ड हे विक्री झालेले आहेत. सदर बाबत फिर्यादी यांनी त्यांचा डेटा तपासणी केले असता ओम साई मोबाईल,दहिसर या पॉईंट ऑफ सेल मधून विक्री करण्यात आलेले 99 मोबाईल्स सिम कार्ड हे ग्राहकांचा डाटा व फिंगरप्रिंट बनावटीकरण व फसवणूक करून कार्यरत केलेले आहेत. त्यावरून फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिल्यावरून वर नमूद प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता मा.पोलीस उपायुक्त श्री. अजयकुमार बन्सल सर यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि कुडाळकर, पोलीस निरीक्षक शिंदे व एटीसी अधिकारी सपोनि दादासाहेब शिंदे व डिटेक्शन अधिकारी सपोनि सूर्यकांत पवार व पथक यांनी नमूद सिम कार्ड विक्री करणाऱ्या इसमाचा अधिक शोध घेतला असता नमूद इसम हा नायगाव येथे स्टेशनच्या बाहेर सिम कार्ड विक्री करत असल्याची माहिती मिळाली.

त्यावरून त्यास नमूद ठिकाणावरून ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने त्यास प्राप्त झालेले डेमो कार्ड वरून ग्राहकांच्या नकळत एकापेक्षा जास्त सिमकार्ड कार्यान्वित करून सिम कार्ड ॲक्टीव केले. तसेच त्याचे सोबत इतर 7 आरोपित इसम यांनी आपसात संगणमत करून ग्राहकांना सिम कार्ड खरेदी करताना दिलेल्या ओळखपत्राचे बनावटीकरण करून ग्राहकांची नावे सिम कार्ड कार्यान्वित करून ते मूळ ग्राहकांना न देता परस्पर इतरांना विक्री करून कंपनीची तसेच ग्राहकांची फसवणूक केली.

अटक आरोपी –
1) शेरू चंद्रबली चव्हाण वय 30 वर्ष रा. ठि- एल एम रोड, एलबीएस नगर, शिव मंदिराजवळ, दहिसर पश्चिम,मुंबई

तपासी अधिकारी –
सपोनि दादासाहेब सिद्धे
सपोनि सुर्यकांत पवार
पो.ह.क्रं 961391/शिंदे
पो.ह.क्रं 980725/खोत
पो.शि.क्रं 111518/सवळी
पो.शि.क्रं 140340/मोरे यानी सदर गुन्हयाचा तपास केला अशी माहिती श्री सुधीर कुडाळकर,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
एम एच बी काॅलनी पोलीस ठाणे,मुंबई यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट