गोंदिया पोलीसांनी गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना परत करून दिली संस्मरणीय व आनंददायी भेट…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया:-पोलीस अधीक्षक, गोंदिया, श्री. निखिल पिंगळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्री. सुनील ताजने यांचे हस्ते गहाळ झालेले एकूण 88 मोबाईल सामान्य नागरीकांना परत करून दिली संस्मरणीय व आनंददायी भेट, विशेष मोहीम अंतर्गत गोंदिया शहर पोलीसाची उल्लेखनीय कामगिरी.
मानवी जिवन सुसहाय करणारी व सर्व जग हातामध्ये सामावून घेणारी, मानवी जिवानातील अत्यावश्यक झालेली गोष्ट म्हणजेच मोबाईल हे बरेचदा नागरीकांकडून गहाळ होतात. त्याबाबत ची तक्रार नागरीक हे मोठ्या प्रमाणात पोलीस ठाणेस नोंद करीत असतात. त्याप्रमाणे मोबाईल गहाळ झाल्याबाबत बऱ्याच तक्रारदार यांनी पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे सन 2021, 2022, 2023 मध्ये तक्रारी दिलेल्या होत्या.

या बाबीची दखल घेत पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्री. सुनील ताजने यांनी गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता विशेष मोहीम राबविण्याबाबत व गहाळ मोबाइलचा शोध घेण्याचे निर्देश सूचना दिलेल्या होत्या.
त्यानुसार मा.वरिष्ठांचे निर्देश सूचनाप्रमाणे पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने गोदिया शहर पोलीसांनी गहाळ मोबाईलचा गुप्त बातमीदार यांचे मदतीने तसेच तांत्रीक मदतीच्या साह्याने शोध घेवून गहाळ झालेल्या मोबाईलचा अथक परिश्रम घेवून, सातत्याने प्रयत्न करून विवीध कंपनीचे महागडे एकूण 88 मोबाईलचा शोध घेवून ते मोबाईल परत मिळवण्यात आले.



गाहाळ झालेले मोबाईल हस्तगत करून मा. श्री.निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक,गोदिया व उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्री. सुनिल ताजणे, आणि पो.नि. श्री चंद्रकांत सूर्यवंशी यांचे हस्ते मुळ मालकांना आज दिनांक 17/06/2023 रोजी पोलीस ठाणें गोंदिया शहर येथे रितसर परत करण्यात येऊन नागरीकांना आनंददायी अशी संस्मरणीय भेट दिलेली आहे.
सदरची कामगिरी मा . वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन गोंदिया शहर चे पो.नि.श्री.चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात सपोनि सागर पाटील, अरविंद राउत, विजय गराड, रामभाऊ व्होंडे, पोउपनि शरद सैदाणे, आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोहवा. जागेश्वर उईके, कवलपाल सिंग भाटीया, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, दिपक रहांगडाले, प्रमोद चव्हाण, ओमेश्वर मेश्राम, मपोहवा. रिना चव्हाण, पोशि. पुरूषोत्तम देशमुख, सुभाष सोनावने, कुनाल बारेवार, मुकेश रावते, दिनेश बिसेन, यांनी तसेच सफौ घनश्याम थेर, पोहवा संतोष भेंडारकर यांनी गहाळ झालेल्या मोबाईल चा सायबर सेल, गोदिया येथील स.पो.नि. श्री. महादेव शिद, पो.हवा दिक्षीत दमाहे, पो.हवा. प्रभाकर पालांदूरकर, पो.हवा. संजय मारवाडे, धनंजय शेंडे यांचे तांत्रिक मदतीने कसून शोध घेतला. नमुद गहाळ मोबाईल शोध घेणेकरीता पोशि. पुरूषोत्तम देशमुख यांनी विशेष परिश्रम घेवून प्रयत्न केले आहे.
गहाळ मोबाईल परत मिळविलेल्या नागरिकांनी गोंदिया जिल्हा पोलीस दल, आणि गोंदिया शहर पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे विशेष आभार मानलेत.
मा. वरिष्ठांनी अथक परिश्रम घेवून गहाळ मोबाइल चा शोध करणाऱ्या अधिकारी अंमलदार यांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com