मुंबई गोवा महामार्गावरील गांधारपाले येथे एका तरुणाच्या जागीच झालेल्या मृत्यूमुळे 4 तास ग्रामस्थांकडून महामार्ग बंद…

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड: दिनांक 13 जून 2023 रोजी रात्रीच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टँकरची धडक लागून एका इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे.

एल अँड टी कंपनीच्या गलथान कारभारामुळे हा अपघात झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले आहे.

प्रेम लक्ष्मण पवार वय 22 वर्ष राहणार गांधारपाले तालुका महाड असे मृत तरुणाचे नाव असून तो मुख्य वाहतुकीसाठी बंद असलेल्या रस्त्यावरून चालत जात असताना अचानक मागून आलेल्या टॅंकरने त्याला जोरात धडक दिली या धडके मध्ये प्रेम पवार यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.

त्यामुळेच स्थानिक ग्रामस्थांनी जवळजवळ चार ते पाच तास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद केल्यामुळे वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

घटनास्थळी महाशक्ती ॲम्बुलन्स व पोलीस तात्काळ दाखल होवुन सदरचा मृत्यूदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला असून या संपूर्ण अपघाताचा अधिक तपास महाड शहर पोलीस करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट