डोंबिवलीत विना नंबरची मोटार स्कुटर चोरी करुन पळणारा आणि पोलीसाना शिविगाळ करुन अंगावर धावून येणाऱ्या च्या आवळल्या मुसक्या…
उपसंपादक-रणजित मस्के
डोंबिवली: दिनांक 9 जुन 2023 रोजी आरोपी संतोष सुरेश कांबळे वय 26 वर्षे रहाणार त्रिमूर्ती नगर झोपडपट्टी , शेलार नाका,कल्याण रोड, डोंबिवली पूर्व हा विना क्रमांकाची मोटार स्कूटर चालविताना दिसून आल्याने त्यास थांबविण्याचा इशारा केला असता त्याने आपले ताब्यातील मोटार स्कूटर ही घेऊन भरधाव वेगात गणपती मंदिराच्या दिशेने घेऊन गेला म्हणून फिर्यादी पोलीस हवालदार रविंद्र करपे याना सदरची स्कूटर ही चोरीची असल्याचा संशय आल्याने त्याचा पाठलाग करून त्यास थांबवून त्याच्या ताब्यातील टी.व्ही. एस. ज्युपीटर कंपनीची स्कूटर नमुद वाहनाच्या कागदपत्रां बाबत विचारपुस केली असता ती न सादर करता आरोपी याने फिर्यादी हे शासकीय गणवेशात असताना देखील त्याचे व सहकारी पोलीस अंमलदार यांना शिवीगाळ करून त्यांचे अंगावर धावून फिर्यादी यांची सरकारी पॅट फाडून दुखापती केली .तसेच फिर्यादी यांचे सहकारी पोलीस अंमलदार यांची काॅलर पकडून ते करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणुन त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 353,332,504 मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 177,130 (3),महा मोटार वाहन नियम 1989 कलम 236 अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेवून यापुढील तपास डोंबिवली पोलीस ठाणे करीत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com