किल्ले रायगडावर दरड कोसळून एकाचा मृत्यू

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:– एकाच आठवड्यामध्ये तिघांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना प्रशासन मदत करणार का?

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. आज एका तरुणावर दरड कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. गेल्या आठवड्यामध्ये एकाचा शॉक लागून तर एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. आज किल्ले रायगड वर दरड कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रशांत अरुण गुंड राहणार सोलापूर असे मृत तरुणाचे नाव असून सदरचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे. महाड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अवसरमोल यांच्या मार्गदर्शनाखाली महाड तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत. एकाच आठवड्यामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला आहे आत्ता तरी सदर मृत्यूच्या नातेवाईकांना प्रशासन मदत करणार का असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com