दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने बेकायदेशीररित्या तलवार बाळगणा-या इसमास केलेहत्यारासह जेरबंद

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नाशिक :- मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालयात नाशिक शहर हद्दीत अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळणारे इसम / गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याकरीता दरोडा व शस्त्र विरोधी पथक तयार / निर्माण करून कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने मा. श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री वसंत मोरे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) नाशिक शहर यांनी अवैध अग्नीशस्त्र बाळणा-या गुन्हेगारांची माहिती काढुन कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

दरोडा व शस्त्र विरोधी पथकातील पोलीस अंमलदारांना दि. ३०/०५/२०२३ रोजी गुप्त बातमी मिळाली की आडगांव पोलीस स्टेशन हद्दीत इसम नामे रोहित केदार थोरात हा हातात तलवार सारखे हत्यार घेवुन निलगिरीबाग परिसरात फिरत आहे. सदरच्या माहीतीवरून दरोडा व शस्त्र विरोधी पथक नाशिक शहर यांनी इसम नामे रोहित केदार थोरात वय १९ वर्षे रा. निलगिरी बाग जवळ, कोळीवाडा गल्ली नं. १, औरंगाबाद रोड, नाशिक यास सापळा रचुन ताब्यात घेतले. त्याचेजवळ ०१ धारदार लोखंडी तलवार जवळ बाळगतांना मिळुन आल्याने व त्याने मा. पोलीस आयुक्त कार्यालयाकडील शस्त्र बंदी मनाई आदेशाचे भंग केल्याने त्यांचे विरुद्ध आडगांव पोलीस ठाणे येथे शस्त्र अधिनियम कलम ४/२५, भारतीय दंड संहिता कलम १८८, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (गुन्हे), नाशिक शहर, मा. श्री. वसंत मोरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व शस्त्र विरोधीपथक मधील सपोनि / किरण रॉदळे व पोलीस अंमलदार १) पोहवा / विजयकुमार सुर्यवंशी २ ) पोअं / महेश खांडबहाले ३) पोअं. / संदीप डावरे ४) पोना / मोहन देशमुख ५ ) मपोअं / मनिषा सौरभ कांबळे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट