वैजापुर शहरातील आनंदनगर येथील उच्चभ्रु वसाहतीतील ग्रिन नेट शेड मध्ये भरलेला जुगाराचा अड्डा उध्वस्त …

उपसंपादक-रणजित मस्के
वैजापुर:-सहा. पोलीस अधीक्षकांची कारवाई .. 20 आरोपीच्या ताब्यातुन 31,88,627/- रुपयांचा मुद्देमाल जप्त .
मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी जिल्हयातील अवैधधंद्या बाबत सक्त भुमिका घेत अवैध धंदे चालविणा-यावर धडक कायदेशिर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिकारी यांनी दिले आहेत.
याच अनुषंगाने मा. महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक, वैजापुर उपविभाग यांना दिनांक 01/6/2023 रोजी गोपनिय माहिती मिळाली कि वैजापुर – रोटेगाव रोडवरिल अमर हॉटेलच्या पाठीमागील आनंदनगर मधील उच्च भ्रु लोक वसाहतीच्या मध्यभागी असलेल्या चंद्रपाल राजपुत याचे घराशेजारील मोकळया जागेत ग्रिन नेटचे शेड टाकुन यामध्ये मोठया प्रमाणावर जिल्हयाचे बाहेरील व्यक्ती सहभागी होवुन पत्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती.
यावरून मा. महक स्वामी सहा. पोलीस अधीक्षक यांनी पोलीसांची तीन पथके तयार करून अत्यंत गोपनीय पध्दतीने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पोहचुन पथकांना कारवाईच्या अनुषंगाने परिसरात घेराव घालुन सापळा लावला यावेळी पोलीसांची रेकी करण्यासाठी काही अंतरावर एक ईसम ठेवण्यात आला होता. जेणे करून पोलीसांची चाहुल लागताच जुगारींना माहिती पोहच होवुन ते पळुन जातील. याबाबत मा. महक स्वामी मॅडम यांनी पेालीसांची वेगवेगळी पथके तयार करून पथकातील पोलीसांनी या संपुर्ण परिसराची बारकाईने व छुप्यापध्दतीने पाहणी व पडताळणी करून सापळा लावुन छापा मारण्याचे नियोजन केले. यानुसार पोलीसांचे पथकांनी 17:45 वाजता पोलीसांचे पथकांने लपत छपत जावुन पडताळणी केली असता तेथे मोठया प्रमाणावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग केलेली दिसुन आली व त्यासमोरिल मोकळया जागेतील ग्रिन नेट शेड मध्ये काही ईसम हे पत्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळतांना दिसुन आले. यावरुन पथकांनी अचानक घेराव टाकुन छापा टाकला असता पोलीसांचे अचानकच्या कारवाईने जुगारी ईसमांची धांदल उडाली व यातील काही ईसम हे मिळेल त्या रस्त्याने सैरावैर पळत सुटले परंतु तरीही पोलीसांचे पथकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. या संपुर्ण कारवाईत 20 जुगारी ईसम मिळुन आले आहेत.

नुमद कारवाई मध्ये रोख 79,637/- रुपयांसह 04 चारचाकी वाहने, 14 दुचाकी वाहने, 16 मोबाईल फोन, 57 पत्ताचे कॅट, 45 प्लॉस्टीकचे कॉईन इतर जुगाराचे साहित्य असे एकुण 31,88,627/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे वैजापुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस ठाणे वैजापुर हे करित आहेत.
नमुद कारवाई ही मा.मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली मा. महक स्वामी , साहाय्यक पोलीस अधीक्षक, श्रीमती निशा बनसोड, स.पो.नि. श्री. श्रीराम केळे, पो.उप.नि.पोलीस अंमलदार अजबसिंग गोलवाल, शिवनाथ सरोदे, अमोल मोरे, संजय घुगे, गोपाल जोनवाल, वर्षा गाडेकर, सविता मोटे, मोना पवार, यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com