खुनाचे गुन्हयातील आरोपींना मानपाडा पोलीस ठाणेकडुन ०२ तासात अटक

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

डोंबिवली मानपाडा – मानपाडा पोलीस ठाणेचे हद्दीत साईश्रध्दा बिल्डींगचे मागे, सोनारपाडा, डोंबिवली पूर्व या ठिकाणी एका अनोळखी इसमाचे प्रेत कचन्यामध्ये पडले असल्याची माहिती पोलीस ठाणेस प्राप्त झाली. त्यानुसार सदर बिल्डींगचे मागे जावून खात्री केली असता, एका अनोळखी इसमाचे प्रेत सदर ठिकाणी आढळुन आले त्याचे नाकातोंडास, हातास व पाया जखमा होत्या. सदरचा इसम कोण आहे त्यास कोणी मारले याचा कोणताही सुगावा नसताना, मानपाडा पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शेखर बागडे यांनी लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकाने अधिकारी व अंमलदार यांची तीन पथके तयार करून, त्यांना गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना व मार्गदर्शन करून रवाना केले.

सदर मयत इसमाची कोणतीही ओळख नसताना तसेच त्यास कोणी मारले यानी कोणतीही माहिती नसताना, गुप्त बातमीदारामार्फत केलेल्या तपासात, सदर मयत इसमाचे नांव राजेश रामवृक्ष असून तो डोबिवली शहरात मिळेल त्या ठिकाणी बिगारीचे काम करीत होता व त्यास मिळेल त्या ठिकाणी तो झोपत होता. त्याची सोनारपाडा येथे राहणारा दादु जाधव यांचेसह तो कभी कभी दारु पित असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार केलेल्या चौकशीत सोनारपाडा, डोंबिवली पूर्व येथील साईदा बिल्डींग मध्ये राहणारा इसम नामे दादु मदु जाधव उर्फ पाटील यास ताब्यात सेवुन त्याचेकडे केलेल्या चौकशीत दादु जाधव व त्याचा मित्र विनोद हे राजेश याचेसोबत दारू पित असायचे, दारु विक्री करणारा यास राजेश याने दादु जाधव व विनोद याचेबद्दल बुगल्या केल्याचे दादु जाधव यास समजल्याने त्या दोषांनी आपसांत संगनमत करून दिनांक २५/०५/२०२३ रोजी राजेश यांचेसोबत जेवण करुन त्यास दाद जाधव यांचे साई बिल्डींगमधील खोलीत नेले. तेथे त्यास दारुवाल्यास चुगली का करतो यावरून त्यांचेत वाद होवून, दादु जाधव व विनोद यानी लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने राजेशला मारहाण केली. सदर मारहाणीत राजेश जमीनीवर खाली पडला, तो काही हालचाल करीत नसल्याचे पाहुन तो मयत झाल्याची त्यांची खात्री झाल्याने त्यांनी प्रेताची विल्हेवाट लावणेसाठी सदरचे प्रेत दादु जाधव व विनोद यानी रुमचे खिडकीमधुन बिल्डींगचे खाली फेकुन देवुन, रुममध्ये असलेले रक्ताचे डाग कपडयाने पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

सदर गुन्हयात आरोपी निष्पन्न नसतानाही, मानपाडा पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी गुप्त बातमीदार तसेच कौशल्याचा वापर करून सदर गुन्हयात आरोपीत नामे दादु मदु जाधव उर्फ पाटील रा. साईबा बिल्डींग, दुसरा मजला, फ्लॅट नं. २०३, सोनारपाडा, डोंबिवली पूर्व व विनोद राजाराम पडवळ, रा. श्री साई कृपा बिल्लोग चौथा माळा, रुम नं. ४०१, सोनारपाडा, डोंबिवली पूर्व यांना अटक करण्यात आली असून, सदर आरोपीत यांनी गुन्हयाची कबुली दिलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोनिरी. अतुल लंबे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर श्री. जय जीत सिंग, मा. पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर श्री. दत्तात्रय कराळे, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण श्री. महेश पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण श्री सचिन गुंजाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग श्री. सुनिल कुराडे, वयोनि श्री. शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि गुन्हे श्री. बाळासाहेब पवार, पीनिरी. अतुल लंबे, सपोनि / अविनाश वनवे, सपोनिरी, सुरेश डॉबरे, सपोनिरी. सुनिल तारमळे, सपोनिरी. श्रीकृष्ण गोरे, पोहवा राजकुमार खिलारे, पोहवा / शिरीष पाटील, पोहवा / सुनिल पवार, पोहवा / दिपक गडगे, पोहवा विकास माळी, पोना/ शांताराम कसवे, पोना प्रविण किनरे पोना / यलप्पा पाटील, पोना/ देवा पवार, पोना/ अनिल घुगे, पोशि/ अशोक आहेर, पोशि/ विजय आव्हाड, पोशि/ विनोद ढाकणे, पोशि/महेंद्र मजा यांचे पथकाने केली आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालय

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट