मुंबई गोवा महामार्गावर हॉटेल ओपन अब्रेला खरवली फाटा येथे ट्रकने उभ्या असलेल्या एस पी पावर रस्त्याचा कॉकरेटीकटन करणाऱ्या पावर मशीनला दिली जोरदार धडक
प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव :-मुंबई गोवा महामार्गावर दि.२४ मे रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मौजे खरवली फाटा हॉटेल ओपन अब्रेला समोरील उभ्या असलेल्या कॉकरेटिकरन मॉडेल मशीन रिटजिन एस पी ९४०० पावर हिला ट्रक क्रमांक एम एच ०८ डब्लू ८६४३ हिने समोरून ठोकर मारून अपघात केल्याची घटना घडली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की मुंबई गोवा महामार्गावर चालू असलेल्या रस्त्याच्या कामानिमित्त कॉकरेटीकरणं मॉडेल मशीनं ही उभी होती परंतु समोरून येणाऱ्या ट्रक चालक यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधावं वेगाने हायगायीने बेकायदेशीर चालवीत त्याच्या समोर असणाऱ्या कॉकरेटीकरण मशीन ला जोरदार धडक दिली या घटनेची खबर माणगांव पोलीस ठाण्यात समजतात ट्रक चालक याच्याविरुद्ध माणगांव पोलीस ठाण्यात कॉ गु रजि नं १६१/२०२३ भा द वि सं कलम २७९,४२७ मो. वा.क. अधि १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून माणगांव पोलीस ठाण्याचे माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटिल यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास म. पो. हवालदार ओमले व पो हवालदार कोळेकर हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com
