पालघर पोलीसांकडून अवैधरित्या दारु वाहतुक करणा-या आरोपीतांवर कारवाई….

उपसंपादक-रणजित मस्के
पालघर: दि.२०/०५/२०२३ रोजी श्री बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आझाद ऊर्फ नसीमुददीन निजामुददीन हाफेस रा. नवसारी गुजरात हा इसम खानवेल येथून वेगवेगळ्या मोटार कारमध्ये अवैध्यरित्या वेगवेगळ्या प्रकारची दारु भरुन ती जव्हार – मोखाडा मार्ग धुळे येथून पुन्हा गुजरात राज्यात विक्रीकरीता घेवून जात असल्याची माहिती मिळाली. सदर प्राप्त माहितीच्या आधारे श्री. अनिल विभुते, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व श्री. संजयकुमार ब्राम्हणे, पोलीस निरीक्षक, मोखाडा पोलीस ठाणे यांना वेगवेगळी पथके तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने मोखाडा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी मोखाडा पोलीस ठाणे हद्दितील निळमाती येथे नाकाबंदी सुरू केली. सदर नाकाबंदी दरम्याण संशयीत वाहने चेक करत असताना दि.२१/०५/२०२३ रोजी रात्री ०३.३५ वा. चे सुमारास जव्हार बाजूकडून प्राप्त बातमीमधील संशयीत स्कॉरपिओ मोटार कार क्रमांक एम.एच.०२ / सी.बी./४६०७ ही गाडी न थांबता नाकाबंदीला लावलेले बॅरीकेट्स उडवून पळून जात असताना नाकाबंदी करीत असलेल्या अंमलदारांनी सदर गाडीचा पाठलाग करून पकडले असता त्या कारमधील चालक अमृतलाल परमानंद दोडेजा वय ४५ वर्षे राहणार तुलसीवन चाल, पहिली गल्ली, छापरा रोड, नवसारी जिल्हा नवसारी राज्य गुजरात याने पोलीसांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास ताब्यात घेवून त्याचे ताब्यातील मोटार कारमधील मालाबाबत विचारले असता, त्याने त्याचे ताव्यातील स्कॉरपिओ मध्ये व मागील फॉरच्युनर व इनोव्हा या गाडयांमध्ये खानवेल येथून दमन बनावटीची दारु अवैध्यरित्या विनापरवाना ‘भरुन ते धुळे मार्ग गुजरात राज्यात नेवून विक्री करण्यासाठी घेवून जात असल्याचे सांगीतले.

त्यानंतर पाठीमागे असलेली फॉरच्युनर मोटार कार क्रमांक जी. जे. ०१/ के. क्यू. /२७२८ हिस थांबवून त्यामधील चालक ललीतकुमार रामुभाई सुमड वय ३७ वर्षे राहणार राकेशभाई चाळ रुम नं.८, उधवाडा सारण वापी ता. वापी जिल्हा वलसाड राज्य गुजरात यास ताब्यात घेतले. त्यादरम्यान मागून आलेल्या इनोव्हा मोटार कार क्रमांक एम.एच.०२ / सी. एच. / १९४८ हीस देखील थांबण्याचा इशारा केला असता त्यावरील चालक व त्याचे बाजूस बसलेला इसमांनी इनोव्हा मोटार कार थांबवून कारमधून बाहेर पडून जंगलात पळून गेले. त्याचा जंगल परीसरात शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.

सदर ताब्यात घेण्यात आलेले दोन इसम व अवैध दारु वाहतुक करणारी स्कॉरपिओ मोटार कार क्रमांक एम.एच.०२/सी.बी. / ४६०७, फॉरच्युनर मोटार कार क्रमांक जी. जे. ०१/ के.क्यु./२७२८, इनोव्हा मोटार कार क्रमांक एम.एच.०२ / सी.एच./ १९४८ असे ताब्यात घेवून मोखाडा पोलीस ठाणे येथे आणून त्यामध्ये खालील वर्णनाचा व किंमतीचा दारुबंदी गुन्हयाचा माल मिळून आला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे.
१ १२,९६०/-
रुपये किमतीची रॉकफोड क्लासिकफायनेस्ट बॅन्डेड विस्की ७५० मिलीच्या २४ काचेच्या सिलबंद बाटल्या.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com