मौजे सुंदरवाडी, महाड येथे मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात बाईक-स्वार विठ्ठल म्हामुणकर याचा जागीच मृत्यू…

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड: दिनांक 21.05.2023 रोजी 11.15 वाजताच्या सुमारास म पो केंद्र महाड हद्दीत मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 वर मौजे सुंदरवाडी तालुका महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत यांतील बजाज डिस्कवर क्रमांक MH.06.BF.2791वरील चालक विठ्ठल रामचंद्र म्हामुणकर वय 55 वर्षे रा. काळीज ता. महाड हे मुंबई गोवाहायवे रोडने मुबई बाजूकडून गोवा बाजूकडे जात असताना आपली मोटार सायकल गोवा लेनने न जाता मुंबई लेनने चालवत घेऊन जाऊन समोरून गोवा बाजूकडून येणारी टाटा झेस्ट कार क्र. MH03CP/4469 हिस ठोकर मारून अपघात झाला.

     सदर अपघातामध्ये मोटार सायकल चालक विठ्ठल रामचंद्र म्हामुनकर यास डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत होऊन मयत झाला आहे.

      रस्त्यावरील दोन्ही वाहने रोडचे बाजूला करून वाहतूक सुरळीत चालू केली. तसेच मयत यास रुग्णवाहिकेतून सरकारी हॉस्पिटल महाड येथे पाठविण्यात आले आहे.
      
    तरी सदर प्राणांतिक अपघात बाबत सविस्तर अहवाल असा की,
   टिप:- १. मयत मोटर सायकल चालक याने हेल्मेट परिधान केले न्हवते.                                  २. सदर ठिकाण हे ब्लॅक स्पॉट नाही.

माहिती मिळाली- 11:18 रवाना वेळ- 11:19 पोहचलो – 11:28 कार्यवाही पूर्ण- 12:15 अशी माहिती
श्री .संजय भोसले प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस केंद्र महाड यानी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट