माणगांव तालुक्यात तीन ठिकाणी गावठी हातभट्टी दारुवर पोलिसांची बेधडक कारवाई…

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार

माणगांव :माणगांव तालुक्यातील रुद्रवली आदिवासी वाडी,महादपोली व सुर्ले आदिवासीवाडी या ठिकाणी गावठी हातभट्टी तयार केलेली दारू व नवसागर गूळ मिश्रित केलेली दारू माणगांव पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतली आहे.

रुद्रवली गावच्या हद्दीत पूर्वेकडील रस्त्याच्या दक्षिणेस आंब्याच्या झाडाखाली आरोपी राईजा बाबुराव पवार वय 30 वर्ष रहाणार रुद्रवली आदिवासीवाडी येथे १५०० रुपये किंमतीचे दोन प्लास्टिक ड्रम प्रत्येकी कॅनमध्ये ५ लिटर दारू १०० रुपये प्रमाणे स्वतः च्या फायद्याकरिता बनवित असताना आढळून आले.

तसेच महादपोळी या ठिकाणी आरोपी सुभाष तुकाराम पवार वय वर्ष ३५ रा. महादपोळी ता. माणगांव यांनी २० रुपये किमतीचा प्लास्टिकचा ड्रम त्यात ४ लिटर हातभट्टी गावठी दारू कॅनसह रुपये १५०० व रुपये ३००लिटर गूळ नवसागर सहित पकडण्यात आले.

त्याच प्रमाणे सुर्ले आदिवासीवाडी ता. माणगांव आरोपी संतोष पांडुरंग जाधव वय 42 वर्ष रहाणार सुर्ले आदिवाशी, ता. माणगांव ५२० रुपये लिटरचा किमतीचा प्लास्टिकचा ड्रम त्यात ५ लिटर गावठी हातभट्टीची तयार केलेली दारू व २००० रु.४०० लिटर गूळ नवसागर मिश्रित रसायनं माणगांव पोलिसांनी जप्त केले आहे.

या घटनेची खबर माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रामनाथ डोईफोडे व मोरेश्वर ओमले, यांनी माणगांव पोलीस ठाण्यात दिली असून आरोपी एक याच्यावरती दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ खंड (ई ) प्रमाणे, आरोपी क्रमांक दोन वरती दारूबंदी कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नं.३ संतोष जाधव याच्या विरोधात दारूबंदी कायदा कलम ६५ प्रमाणे माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील याच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास पोलीस नाईक धनावडे, पोलीस हवालदार तुनतुने व हवालदार दोंडवुलकर हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट