माणगांवमध्ये दिवसाढवळ्या चोराचा सुळसुळाट, भर दुपारी बाजारपेठेत एका अज्ञात इसमाकडून चैन चोरी करण्याचा प्रयत्न…….

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव :-माणगांव बाजारपेठेतून दि.१८ मे रोजी दुपारी ५.१५ वाजण्याच्या सुमारास सुषमा अशोक मेहता वय वर्ष ६० रा पार्थ बंगला दत्त नगर माणगांव या आपल्या नातेवाईकांकडे जात असता बँक ऑफ इंडिया अनंत बिल्डिंगजवळ आल्या असता पाठीमागून आलेल्या अज्ञात चोरट्यानी सुषमा मेहता हिच्या गळ्यातील चैन खेचून पळवाट काढली परंतु सुषमा मेहता यांनी प्रसंगावधान दाखवून आरडाओरड केला असता त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी चोराचा पाठलाग करीत चोराला पकडले.
वरील मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की फिर्यादी सुषमा मेहता ही तिच्या बहिणीकडे पुष्पलता दोशी व चुलत वडील मंगल शेठ यांना भेटण्याकरिता जात असता बँक ऑफ इंडिया अनंत बिल्डिंग च्या पायऱ्या छडत असताना पाठीमागून आलेला एक अज्ञात चोरटा हा जीना चढून पुढे जाऊन पुन्हा पाच सहा पायऱ्या खाली उतरला व फिर्यादी सुषमा मेहता हिच्या गळ्यात असलेली सोन्याची साखळी किंमत रुपये एक लाख साठ हजार गळ्यातील चैन खेचून पोबारा केला परंतु सुषमा मेहता हिच्या ओरडण्याने तेथील असणाऱ्या नागरिकांनी चोराचा पाठलाग करून त्याला पकडला व चांगलाच चोप दिला तसेच चोराने आणलेली ऑटो रिक्षा क्रमांक एम एच ४६ बी डी ८४२० सहित चोराला पोलिसानी ताब्यात घेतले असून अज्ञात चोरट्या विरुद्ध कॉ.गुन्हा रजि नं १५३/२०२३ भा द वि सं कलम ३९२ प्रमाणे माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर आघाव व पोलीस नाईक जाधव हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com