नाशिक शहर पोलीसांकडून गुंगीचे औषध देऊन कार चालकास लुटणाऱ्यास अटक गुन्हे शाखेच्या युनिट-1 पथकाची कामगिरी…
उपसंपादक – रणजित मस्के
नाशिक : उबेर कंपनीच्या कारचालकास गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्यास होता. अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकास यश आले आहे. याप्रकरणी शुभम उर्फ स्वदेश दीपक नागपुरे (वय २५, रा. साईदर्शन रोहाउस, श्री रामचंद्रनगरजवळ एस्सार पेट्रोलपंपमागे, दिंडोरी रोड, म्हसरूळ) यास अटक करण्यात आली आहे. तो सध्या जास्मीन सोसायटी, आसनगाव ईस्ट, रहाटी, जि. ठाणे येथे वास्तव्यास होता.

उबेर कंपनीच्या स्वीफ्ट कारवरील चालक राहुल प्रसाद शिवनंदन प्रसाद (वय २४, रा. तीन हात नाका, ज्ञानसाधना कॉलेजजवळ, ठाणे) यांच्या कारमध्ये प्रवासी म्हणून एका अज्ञात इसमाने भाडेतत्त्वावर मुंबई येथून नाशिक येथे सोडण्यास सांगितले होते. उबेर चालकास प्रवासी इसमाने कारचालकास नकळत पाण्यात गुंगीचे औषध दिले. ते पाणी पिल्याने चालकास गुंगी आल्यानंतर त्याच्या खिशातील पैशाचे पाकोट व मोबाइल फोन चोरून प्रवासी पळून गेला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकान्यांनी गुन्हे शाखेच्या युनिट एकला समांतर तपासाचे निर्देश दिले. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ व सहकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून मानवी कौशल्याचा व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला. तेव्हा हवालदार सुरेश माळोदे यांना संशयित इसम हा नाशिकरोड बसस्थानक येथे येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यास सापळा रचून अटक करण्यात आली. अंगझडतीत आरोपीकडे कारचालकाचा मोबाइल मिळून आला. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट एक पथकातील सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागूल, हवालदार सुरेश माळोदे, मुख्तार शेख आदींनी ही कामगिरी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com