श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री.आप बागर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा यांनी सातारा जिल्हयात बेकायदेशीर हलचाली (illegal activities) करणारे इसमांचेवर लक्ष पुरवून काही आक्षेपार्ह आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत.
दि.०९/०५/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, सातारा ते पुणे जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ ये सहिसरोडवर दिग्वीजय टोपोटा शोरूमचे समोर चार इसम व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरीस) विक्री करण्याकरीता कोणासही संशय येवू नये म्हणून एम.एच.०८ ए.पी.३४४३ या अॅम्ब्यूलना मधून येणार आहेत. त्याअनुशंगाने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे अधिपत्याखाली पथक तयार करून त्यांना नमुद इसमांना ताध्यात घेवून काही आक्षेपार्ह मिळून आल्यास त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे नमुद तपास पथकाने वनविभागाकडील अधिकारी यांचे मदतीने दिग्वीजय टोयोटा शोरूमचे समोर राष्ट्रीय महामार्गावर सापळा लावला. थोडयाच हातप्राप्त बातमीतील अॅम्ब्युलन्स क्रमांक एम.एच.०८ ए.पी.३४४३ ही पुणे बाजूकडून सहिसरोडने सातारा बाजूकडे येताना दिसली. त्यास पथकाने चाचपून अम्ब्युलन्सची तपासणी केली असता अॅम्ब्युलनामध्ये एका पिशवीमध्ये एक काळपट रंगाचा ओबड धोड आकाराचा पदार्थ मिळून आला. त्याची वनअधिकारी यांनी प्राथमिक तपासणी करून तो पदार्थ हेल माश्याची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरसीस) असून तो प्रतिबंधीत आहे व त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रती किलो कोटी रुपये किमत १ असल्याचे सांगीतल्याने नमुद चारही इसमांना ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द सातारा तालुका पोलीस ठाणे गु.र.नं.२०६/२०२२ वन्यप्राणी संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४५, ४२, ४४, ४८, ५१ अन्वये गुन्हा नोंद केला.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री.बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र मोरे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, मदन फाळके, मधुकर गुरव, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, सुधीर बनकर, अतिश पाडगे, संतोष पवार, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद चेचले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, निलेश काटकर, अर्जित कर्णे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, विशाल पवार, मोहन पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जय प्रविण पवार, मधुर देशमुख, वनविभागाकडील वनविभाकडील निवृत्तीचा वनक्षेत्र अधिकारी सातारा, कुशाल पावरा धनपाल सातारा, राजकुमार मोलगी वनरक्षक सातारा यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. धापू चांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
आरोपींची नावे-
१) सिध्दार्थ विठ्ठल लाकडे वय ३१ वर्षे रा. कासारविली ता. जि. रत्नागिरी, २) अनिस इसा शेख वय ३८ वर्षे रा. शिवाजीनगर हुपरी ता.हातकणंगले जि. कोल्हापूर,
३) नासिर अहमंद रहिमान राऊत वय ४० वर्षे रा. मडकंवा ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी, ४) किरण गोविंद भाटकर वय ५० वर्षे रा. भाटीये ता. जि. रत्नागीरी
उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :