कळदा येथील महिलेचा निघृण खून करणाऱ्या दोन्ही आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या…!!

0
Spread the love

दिनांक 01/05/2023 रोजी महाराष्ट्र राज्याचा 63 वा वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील कवायत मैदानावर मुख्य ध्वजारोहण समारंभ कार्यक्रम सुरु असतांना सकाळी 11.00 वा. सुमारास पोलीसांना माहिती मिळाली की, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कोळदा शिवारातील श्री. नरोत्तम पाटील यांचे बाजरीचे पिक असलेल्या शेतात एक 30 ते 35 वर्षे वयाची अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती कोळदा गावातील नागरिकांकडून मिळाली…

घटनेची माहिती मिळताच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील व अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मृतदेहाची पाहणी केली असता, साडी व ब्लाउज परिधान केलेली एक अनोळखी महिला रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमीनीवर पडलेली होती. तसेच मृत महिलेच्या गळयावर, मानेवर धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारून बाजरी पिकाचे शेतात फेकुन दिले होते. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार येथे पाठवून तात्काळ नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 140/2023 भा.द.वि. कलम 302 अन्वये अज्ञात आरोपीताविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घडलेली घटना अतिशय निर्घुण होती मयताच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन जिवे टार केले होते. घटना अतिशय सुन्न करणारी होती, म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल पवार यांचेशी गुन्ह्याबाबत सविस्तर चर्चा करुन गुन्हा उघडकिस आणण्यासाठी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या.
घटनास्थळावर मयताची ओळख पटू शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे, मोबाईल, CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तु मिळुन आलेली नव्हती. तसेच सदरचा गुन्हा हा कधी घडला याबाबत कोणतीही माहिती नसल्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे व मयत महिला कोण ? मयताचे मारेकरी कोण ? मारण्याचा उद्देश काय ? असे मोठे प्रश्न अजुनही पोलीसांपुढे उभे होते.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली मयताची ओळख पटविण्यसाठी व गुन्ह्यात सहभागी असलेल्या अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. गुन्हा दाखल झाल्यापासून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे हे नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथेच तळ ठोकून होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने घटनास्थळाच्या आजु-बाजुच्या परिसरात व गावात मयताचा फोटो व हातावर गोंदलेले फोटो दाखवित होते. तर एक पथक घटनास्थळापासून थोड्या अंतरावर असलेल्या साखर कारखान्यात जावून माहिती घेत होते. मयताचा फोटो व हातावर गोंदलेले फोटो समाज माध्यमांवर देखील प्रसिध्द करण्यात आला, जेणे करुन मयताची ओळख पटू शकेल परंतु तरी देखील यश मिळत नव्हते.

समाज माध्यमावर मयताचा व मयताच्या हातवर गोंदलेले फोटो प्रसिध्द केल्यानंतर दिनांक 01/05/2023 रोजी दुपारी 03.00 वा. सुमारास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना सुज्ञ नागरिकाने कळविले की, समाज माध्यमावर मयत महिलेचा जो फोटो प्रसिध्द करण्यात आलेला आहे ती महिला कोळदा येथील श्री. जतन देवराम वळवी यांच्या मुलीसारखी दिसत आहे, परंतु बरीच वर्षे झाली ती कोळदा गावी आलेली नाही म्हणून मयत महिला ही निश्चीत तिच असेल असे नाही अशी त्रोटक माहिती मिळाली.

मिळालेली माहिती जरी त्रोटक असली तरी सुतावरून स्वर्ग गाठणे या म्हणीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कोळदा येथे जावून श्री. जतन वळवी यांची भेट घेतली व त्यांच्याकडे विचारपूस केली. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर पथकाने श्री. जतन वळवी यांना मयताच्या हातावर गोंदलेले फोटो दाखविले असता त्यांनी ती त्यांचीच मुलगी मंगलीबाई यशवंत ठाकरे वय-29 रा. कोळदे ता. जि. नंदुरबार असे सांगितले. मयताची ओळख पटविण्याबाबतचा पहिला टप्पा पार करण्यात पथकाला यश आले होते, परंतु मारेकरी व मारण्याचा उद्देश काय? हे दोन प्रश्न अजुनही पोलीसांपुढे होते.

पथकांनी मयत महिलेची संपूर्ण माहिती काढून तिच्या मारेकऱ्यांचा शोध सुरु केला, त्यादरम्यान नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोळदा येथील महिलेचा खून त्याच गावातील येथील राहणारा इसम नामे बन्या पाडवी व त्याचा साथीदारपिंटू मिल अशांनी मिळून केला आहे. सदरची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांना सांगून दोन्ही संशयीत इसमांना ताब्यात घेण्याबाबत सुचना दिल्या.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील संशयीत बन्या पाडवी व त्याचा साथीदार पिंटू भिल दोघांना ताब्यात घेवुन विचारपुस केली. परंतु आरोपी किती जरी हुशार व चलाख असला तरी तो विचारपूस करतांना काही ना काही चुका करतोच आणि त्याच विसंगत बाबी पथकाने संशयीत आरोपी बन्या पाडवी व त्याचा साथीदार पिंटू भिल यांच्या लक्षात आणून दिल्या व दोन्ही आरोपीतांना बोलते करुन दोन्ही आरोपीतांनी गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती दिली..

ताब्यात घेण्यात आलेले 1) बन्या सन्या पाडवी, वय-55 वर्षे, रा. कोळदा, ता.जि. नंदुरबार 2) परान ऊर्फ प्रविण ऊर्फ पिंट्या धडू भिल, वय 40 वर्षे, रा. कोरीट, ता. जि. नंदुरबार यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कुठल्याही प्रकारचा पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तांत्रिक पुरावा, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे नसतांना

क्लिष्ट अशा गुन्ह्याची उकल लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. खूनासारखा

गंभीर व क्लिष्ट गुन्हा उघड करुन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास नंदुरबार

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी रोख बक्षिस जाहीर केले.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या अमलदारांनी केली आहे.

उपसंपादक – रणजित मस्के

नंदुरबार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट