फोर व्हीलर गाडीची काच फोडुन, मोपेड गाडीची डिकीतुन रोख रक्क्म चोरी करणारे बॅग लिप्टींग करणा-या आंतरराज्य टोळीतील एक सराईत आरोपी जेरबंद, त्याचेकडुन ६ गुन्हे उघडकीस, एकुण ६,५०,०००/- (सहा लाख पन्नास हजार ) रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त…

0
Spread the love

२१.४.२०२३ रोजी
फिर्यादी नाव
गोपालदास हिरालाल मुंदडा वय ५८ रा. सिध्दीविनायक अपार्टमेंन्ट तिसरा मजला रुम नं २ विश्रामबाग सांगली माहिती कशी प्राप्त झाली गोपनीय बातमीदारामार्फत पोहेकॉ / सागर लवटे, अनिल कोळेकर कारवाई करणारे अधिकारी आणि अमलदार
मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली मा. अपर पोलीस अधिक्षक तुषार पाटील (अतिरिक्त कार्यभार) यांचे मार्गदर्शनाखाली

१) पोलीस निरीक्षक सतिश शिंदे
२) सपोनि संदीप शिंदे
सागर लवटे, अनिल कोळेकर, संदीप गुरव, बिरोबा नरळे, जितेंद्र जाधव, संदीप पाटील, सागर टिंगरे, उदयसिंह माळी, विक्रम खोत, संतोष गळवे, संदीप नलवडे, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे

आरोपी ताब्यात वेळ दिनांक
दिनांक ०५.०५.२०२३
आरोपीचे नाव पत्ता

१) मधु भास्कर जाला वय २५ रा. कपरालतिप्पा, जिल्हा नेल्लोर, राज्य. आध्रप्रदेश मधु भास्कर जाला याचे कब्जातून जप्त केला मुद्देमाल

१) ६,००,०००/-रु रोख रक्कम

जप्त मुद्देमाल

२) ५०,०००/- होन्डा कंपनीची मोटार सायकल

३) ०० /- दोन लबरी गलोर (गाडीची काच फोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य )

४) ००/- काच फोडण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी लहान बॉल बेअरींग

५) ००/- वेगवेगळया ४ नंबर असलेले ४ नंबर प्लेट

६) ००/- डिकी खोलण्यासाठी व टायर पंक्चर करण्यासाठी वापर करत असलेले मारतुल टोच्या ६,५०,००० /- रु.उघडकीस आलेले गुन्हे

१) विश्रामबाग पोलीस ठाणे गुरंन ३२३ / २०२३ भा.द.वि.स कलम ३७९
२) विश्रामबाग पोलीस ठाणे गुरंन ५६९ / २०२२ भा.द.वि.स कलम ३७९, ४२७
३) आष्टा पोलीस ठाणे गुरंन ३५२ / २०२२ भा.द.वि.स कलम ३७९,३४ ४) कवठेमहकांळ पोलीस ठाणे गुरंन १२६ / २०२३ भा.द.वि.स कलम ३७९
५) कोल्हापुर जिल्हा शिवाजीनगर ( इंचलकरजी ) पोलीस ठाणे गुरंन ६१८ / २०२२ भा.द.वि.स कलम ३७९
६) कोल्हापुर जिल्हा जुना राजवाडा पोलीस ठाणे गुरंन २९२/२०२३ भा.द.वि.स कलम ३७९

हकीकत

विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २०.४.२०२३ रोजी दुपारी १५.०० वा सुमारास एचडीएफसी बँक, पुष्पराज चौक बँकेजवळ असणा-या एन.डी कोल्ड्रींग जवळ सुझुकी अॅक्सेस गाडी पार्क करुन फिर्यादी गोपालदास हिरालाल मुंदडा यांनी त्याचेकडील असलेली २,९५,०००/- रोख रक्कम रुपये डिकीमध्ये ठेवली होती. यावर आरोपीत यांनी निगरणी करुन सुझुकी अॅक्सेस गाडीचे डिकीतुन वरील रक्कम चोरुन घेऊन गेले बाबत विश्रामबाग पोलीस ठाणे येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक, डॉ. बसवराज तेली व मा. अपर पोलीस अधीक्षक, तुषार पाटील (अतिरीक्त कार्यभार) यांनी बैठकीमध्ये फोर व्हीलर गाडीची काच फोडुन, मोपेड गाडीच्या डिकीतून रोख रक्क्म चोरी करणारे किवा बॅग लिप्टींग करणारे अशा इसमांचेवर लक्ष केंद्रीत करुन सांगली जिल्हयातील घडले गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना सुचना दिल्या होत्या.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, यांनी सपोनि संदीप शिंदे व अमलदार यांचे पथक तयार करुन सांगली जिल्हयातील फोर व्हीलर गाडीची काच फोडुन, मोपेड गाडीच्या डिकीतून रोख रक्क्म चोरी करणारे किंवा बॅग लिप्टींग करणारे अशा इसमाचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते.

नमुद पथकाने सांगली जिल्हयात व परजिल्हयात अशा प्रकारे घडले गुन्हयाचे ठिकाणी भेट देऊन, सदर गुन्हयाचा सखोल तपास करुन अभिलेखावरील माहिती घेतली असता पोहेकॉ / सागर लवटे, अनिल कोळेकर त्यांना | त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचे गुन्हे हे कपरालतिष्पा जिल्हा नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश कडील रेकॉर्डवरील आरोपीनी केले असुन ते कुपवाड, हनुमाननगर मधील गजानन पाटील यांचे भाडयाचे खोलीत राहत असले बाबत माहिती मिळाली. मिळाले माहिती प्रमाणे सपोनि संदीप शिंदे व पथकाने कुपवाड हनुमाननगर मधील गजानन पाटील याचे भाडयाचे खोलीवर छापा मारुन त्या रुममध्ये हजर असले इसमास सपोनि संदीप शिंदे यांनी ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव मधु भास्कर जाला वय २५ रा. कपरलतिप्पा, जिल्हा नेल्लोर, राज्य आध्रप्रदेश असे सागितले. त्यावेळी त्यास सपोनि संदीप शिंदे यांनी मधु जाला त्यास त्याचे कामधंदयाबाबत विचारपुस करता तो काही एक समाधान कारक माहिती सांगत नव्हता. त्यावेळी सपोनि संदीप शिंदे यांनी मधु जाला विश्वासात घेऊन विचारपुस करता त्याने सागितले की, तो व त्याचा साथीदार असे मिळुन मागील काही दिवसापासुन सांगली पुष्पराज चौक, विश्रामबाग व्हाईट हाऊस हॉटेल, कवठेमहकांळ तहसिल कार्यालय, आष्टा येथील प्राथमिक बँक समोरुन तसेच कोल्हापुर येथील ई सेवा केद्र, वारणा बँक शाखा इंचलकरजी या ठिकाणाहून पैसे ठेवलेची निगराणी करुन मोपेड गाडीच्या डिकीतून किवा फोर व्हीलर गाडीची काच फोडुन गाडीतील रोख रक्कम चोरली असल्याची कबुली दिली. त्यावेळी त्याचे घराची पंचासमक्ष घरझडती घेतली असता घरझडती एक काळया रंगाची सॅक मिळुन आली ती उघडुन पाहता त्यामध्ये ६,००,०००/- रु रक्कम मिळाली . मिळाले रोख रकमेबाबत विचारपुस करता मधु जाला यांने सागितले की, सदरची रक्कम ही तो व त्याचे साथीदारयांनी केले गुन्हयातील असुन ती त्याचे वाटणीस आलेली रक्क्म असल्याचे सांगितले. त्यावेळी सपोनि संदीप शिंदे यांनी रोख रक्कम व त्याचे कब्जातील दोन लबरी गलोर, लोखंडी लहान बॉल बेअरींग, ( गाडीची काच फोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य) वेगवेगळया ४ नंबर असलेले ४ प्लेट, डिकी खोलण्यासाठी व टायर पंक्चर करण्यासाठी वापर करत असलेले मारतुल, टोच्या व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात येणारी ५०,०००/- होन्डा कंपनीची मोटार सायकल असा एकुण ६,५०,००० /- रु. मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास कामी आरोपी व मुद्देमाल विश्रामबाग पोलीस ठाणे कडे वर्ग करण्यात आला आहे.

सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील असुन त्याचेवर यापूर्वी गुजरात राज्य, राजकोट सीटी या ठिकाणी ४ गुन्हे दाखल आहेत.

उपसंपादक – रणजित मस्के

सांगली:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट