दि. २९/४/२०२३ रोजी महेंद्र शंकर वाघमारे रा. तळबीड ता. कराड हा मयत झाले बाबत पोलीसांना मिळाले माहितीनुसार घटनास्थळी जावून पोलीसानी प्रेताची पाहणी केली असता तळबीड गावचे मारुती मंदीरा कोणी तरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून छातीवर व पोटावर धारधार शस्त्राने वार करून महेंद्र शंकर वाघमारे रा. तळबीड ता. कराड याचा खुन केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याबाबत तळबीड पोलीस ठाणे दिले खबरी गुरनं ८२/२०२३ मादविक ३०२ अन्वये गुन्हा दाखल करणेत आला असून सदर खबरी वरून पोलीसांनी गुन्हयाचे अनुषंगाने गावातील लोकांचेकडे तसेच बातमीदारा मार्फत व तेथील परिस्थीती वरुन तपास करता तळबीड गावातील दिलीप मारुती साळुंखे यास संशयावरुन ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने मयत हा त्याचे बद्दल गावातील लोकाना त्याचे बद्दल खोटी माहिती देत होता. म्हणून आरोपी याने मयतास मारुती मंदीरा मध्ये त्यास जाब विचारले नंतर मयत याने उडवा उडवीची उत्तरे दिली म्हणून चिडून जावून मारुती मंदीरात असले झेंडयाचे कापडाने त्याचा पहिला गळा आवळून नंतर जवळ असणारे चाकूने छातीवर व पोटावर वार करुन त्याचा खुन केल्याचे कबूली दिल्याने त्यास ता. ३०/४/२०२३ रोजी अटक करून त्याची ता. ४/५/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेणेत आलेली आहे.
सदर गुन्हयाचे तपास कामी गा.पोलीस अधीक्षक सातारा भी समीर शेख, तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा, बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो कराड विभाग कराड श्री रणजित पाटील यांनी केले मार्गदर्शना नुसार या गुन्हयाचा तपास श्री आर आर बरोटे सहा पोलीस निरीक्षक तळबीड पोलीस ठाणे श्रेणी पो. फौजदार, श्री जी.आर बाकले. एस.एम. पिसाळ एस. डी. देशमुख. सहा.पो.फी, बी.जे माने पो.वा.ब.नं. १७१२ ए.के. ऑबासे पो. हवा.ब.नं ४८३. प. को विभूते ८९३ घुटूकडे च.नं २४९६. फडतरे व.नं १६३२. कुंभार ब.नं. ८५७ चालक गायकवाड व.नं १८७५ यानी सदरचा गुन्हा उघडकीस आणणे कामी उत्कृष्ट कामगिरी केली. म्हणून पोलीस अधीक्षक सातारा यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
उपसंपादक – रणजित मस्के
सातारा