अतिशय दुर्मिळ व विशेष संरक्षित खवले मांजर प्राण्याच्या खवल्यांची तस्करी करणारे ०२ इसम जेरबंद…

0
Spread the love

अतिशय दुर्मिळ व विशेष संरक्षित खवले मांजर प्राण्याच्या खवल्यांची तस्करी करणारे ०२ इसम जेरबंद…

उपसंपादक – रणजित मस्के


सांगली:


४ किलो ७५० ग्रॅम वजनाचे खवले किंमत अंदाजे ११,८७,५००/- ( अकरा लाख सत्याऐंशी हजार पाचशे रु) किंमतीचा मुद्देमाल जप्त

वन्यजीव अधिनियम १९७२ कलमान्वये अपराध कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे

गु. घ. ता २.५.२०२३ रोजी

फिर्यादी नाव संदीप आनंदा पाटील पोहेकॉ / १७६३ स्थानिक
गुन्हे अन्वेषण शाखा सांगली

माहिती कशी प्राप्त झाली
सपोनि संदीप शिंदे

कारवाई करणारे अधिकारी आणि अमलदार

स्था. गु. अ. शाखा, सांगली
मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली,मा. अपर पोलीस अधिक्षक तुषार पाटील (अतिरिक्त कार्यभार)
यांचे मार्गदर्शनाखाली

१) पोलीस निरीक्षक सतिश शिंदे
२) सपोनि संदीप शिंदे
संदिप पाटील, संजय कांबळे, संकेत मगदुम, सुनिल चौधरी, सुधीर गोरे, अमोल ऐदाळे, राहूल जाधव, गौतम कांबळे, अजय बेंदरे, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, कॅप्टन गुंडवाडे वन विभागाकडील
१) मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार आण्णा पाटील
२) वनपाल तुषार महालिंग भोरे

वन विभाग, सांगली, अटक वेळ दिनांक

दिनांक ०२.०५.२०२३

आरोपीचे नाव पत्ता

१) इम्रान अहमद मुलाजी वय ४२ वर्षे रा. मु.पो. अलोरे ता. चिपळुण जि. रत्नागिरी २) दिनेश गोपाळ डिंगणकर वय ४५ वर्षे रा. चिंद्रवळे ता. गुहागर जि. रत्नागिरी

१) ११,८७,५००/- रु पांढरे रंगांच्या प्लॅस्टिक गोणी मध्ये तांबुस पांढ-या रंगांचे टणक कवच असलेले खवले ४ कि. ७५० ग्रॅम वजनाचे कि.अं.

२ ) २००/-
रु एक निळया रंगांची रॉक
११,८७,७०० /- रु.

हकीकत

मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली व मा. अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील (अतिरीक्त कार्यभार) यांनी आढावा बैठकीमध्ये सांगली जिल्हयातील अवैध मालाची तस्करी करणारे इसमांचा शोध घेऊन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना सुचना दिल्या होत्या.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी सपोनि संदीप शिंदे व
अमलदार याचे पथक तयार करुन सांगली जिल्हयातील अवैध मालाची तस्करी करणारे इसमाचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई
करण्याबाबत आदेशित केले होते.नमुद पथकाने सांगली जिल्हयातील अवैध मालाची तस्करी करणारे इसमांचा शोध माहिती घेत पेट्रोलिंग करीत असताना सपोनि संदीप शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कुपवाड ते अहिल्यानगर येथील शिवमुद्रा चौक येथे इसम नामे १) इम्रान मुलाणी, रा. चिपळुण २) दिनेश डिंगणकर, ता. गुहागर जि. रत्नागिरी हे अतिशय दुर्मीळ, संरक्षित व नामशेष होत असलेल्या वन्यजीव खवल्या मांजरांची खवले विक्री करणे करीता घेवुन येणार आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाली. मिळाले माहिती प्रमाणे सपोनि संदीप शिंदे यांनी कुपवाड ते अहिल्यानगर येथील शिवमुद्रा चौकाजवळ सापळा लावुन वाँच करीत असताना संशयित ०२ इसम येवुन थांबले. त्यापैकी एका इसमाने निळसर रंगांची रॉक पाठीला अडकविलेली दिसली. मिळाले बातमीप्रमाणे त्या दोघांचा संशय आल्याने सपोनि संदीप शिंदे, वनविभाग कडील दोन अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अमलदारासह त्या दोन इसमांना पळुन जाण्याची संधी न देता जागीच पकडुन, त्यांना सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता, त्यांनी त्यांची नावे १) इम्रान अहमद मुलाजी वय ४२ वर्षे रा. मु.पो. अलोरे ता. चिपळुण जि. रत्नागिरी व २) दिनेश गोपाळ डिंगणकर वय ४५ वर्षे रा. चिंद्रवळे ता. गुहागर जि. रत्नागिरी असे असल्याचे सांगितले. सदर इसमांना त्या ठिकाणी हजर असण्याचे कारण विचारले असता ते काही एक समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्यावेळी सपोनि संदीप शिंदे, वनविभाग कडील दोन अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अमंलदार यांनी त्या दोघाची अंगझडती घेतली असता, अंगझडती मध्ये इम्रान अहमद मुलाजी याचे कब्जात असलेल्या रॉक मध्ये एका प्लॅस्टिक पोत्याच्या गोणी मध्ये खवले मिळुन आले त्याबाबत इम्रान अहमद मुलाजी यास विचारणा केली असता त्याने सांगितले की, सदरचे खवले हे जंगली खबल्या मांजराचे अंगावरील खवले असुन ते खवले दोघे मिळुन विक्री करीता घेवुन आले असल्याचे सांगितले. त्यांचे कब्जात मिळुन आलेल्या खवल्या मांजराचे अंगावरील खवले हे कोठुन व कोणा कडुन आणले याबाबत त्यांना विचारणा केली असता ते त्यांनी त्यांचे गावाकडील शेतामध्ये मरण पावलेल्या खवल्या मांजराचे काढुन घेतले असल्याचे सांगुन त्याची बाजारभावाने जास्त किमंत मिळते याकरीता ते त्यांनी विक्री करीता सांगली येथे घेवुन आले असल्याचे सांगितले. वन विभागा कडील १) मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार आण्णा पाटील २) वनपाल तुषार महालिंग भोरे, वन विभाग, सांगली यांनी पंचासमक्ष सदर खवल्यांची निरीक्षण केले व त्यांनी सदरचे खवले हे अतिशय दुर्मीळ, संरक्षित व नामशेष होत असलेल्या खवल्या मांजराचे असल्याचे सांगितले. सपोनि संदीप शिंदे व त्यांचे पथकाने सदरचे ४ कि. ७५० ग्रॅम वजनाचे ११,८७,५००/- रु तांबुस पांढ-या रंगांचे टणक कवच असलेले अतिशय दुर्मिळ, संरक्षित व नामशेष होत असलेल्या खवल्या मांजराचे खवले पंचासमक्ष सविस्तर पंचनाम्याने जप्त केले आहेत व त्याचे विरुध्द कुपवाड एमआयडी पोलीस ठाणे येथे वन्यजीव अधिनियम १९७२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचे खवले हे अतिशय दुर्मीळ, संरक्षित व नामशेष होत असलेल्या खवल्या मांजराचे असुन सदच्या खवल्यांचा उपयोग महागडी औषधे, आंतरराष्ट्रीय दर्जाची सौंदर्य प्रसाधने इ. बनविण्यासाठी केला जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे सदर खवल्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठया प्रमाणात मागणी असुन याची उच्च दराने विक्री करण्यासाठी तस्करी केली जाते. सदर वन्यजीव नामशेष होण्याचे मार्गावर असल्याने खवले मांजर या प्रजातीच्या संरक्षणासाठी सदर वन्यजिवास शासनाने विशेष संरक्षित प्रजातीमध्ये समाविष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट