रिक्षा व मोटारसायकल चोरी करणा-या दोन ओरापीतांना डोंबिवली पोलीसांनी अटक करुन एकुण ९५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल केला हस्तगत…

उपसंपादक -रणजित मस्के
डोंबिवली :दिनांक :- २०/०४/२०२३ रोजी रात्रौ ०८:०० वाजता ते दिनांक २१/०४/२०२३ रोजी सकाळी ०८:०० वा. दरम्यान फिर्यादी यांची ऑटो रिक्षा क : MH-05/CG-7982 ही हॅन्डल लॉक करून बंदिस्त हॉटेल शेजारी, चोळेगाव तलावाकडे जाणान्या रोडच्या कडेला, डोंबिवली पूर्व येथे पार्क करुन ठेवली असता ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने संमतीशिवाय, लबाडीने चोरी करुन नेली आहे. डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हा नोंद कः – १४६ / २०२३ कलम :- ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
नमुद गुन्हयाचा तपासा दरम्यान सपोनि सानप, पो. हवा – १३०७ / सरनाईक, पोअं ८४१३ / सांगळे यांनी नमुद गुन्हयाचे घटनास्थळाचे आजुबाजुच्या सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यामध्ये दोन संशयीत आरोपीत हे नमुद गुन्हयातील ऑटो रिक्षा कः- एम एच :-०५ सी जी:- ७९८२ ही चोरी करुन घेवुन जाताना दिसुन आल्याने त्यातील आरोपीतांना गुप्त बातमीदार व तांत्रिक मदतीच्या आधारे पिसवली, कल्याण येथुन नमुद गुन्हयातील ऑटो रिक्षाचे पार्ट विक्री करत असताना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे नमुद गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केली त्यांचेकडे अजुन एक R-15 यामाहा कंपनीची मोटार सायकल क:-MH-01, DH-5363 देखील मानपाडा पोलीस ठाणे हददीतुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले. अटक आरोपीतांचे नाव व पत्ता:-

१) श्रीकांत काशीराम शेडगे वय ४९ वर्षे धंदा :- मॅकेनिक राह. वसुंधरा व्हॅली यमुना अपार्टमेंट, रुम नं १०३, पिसवली गाव कल्याण पुर्व जि ठाणे
२) विक्रम लक्ष्मण साळुंखे वय ४३ वर्षे धदा :- रिक्षा चालक राह. रामनगर को ऑप हौ सोसायटी चाळ नं ०३, रुम नं ०१ विठठल मंदीरासमोर, पोलीस चौकीजवळ, विठठलवाडी कल्याण पुर्व जि ठाणे सध्याचा पत्ता:- सुदामा स्मृती बिल्डीं, येथे भाडयाने दुसरा मजला, चोळेगाव ठाकुर्ली पूर्व डोंबिवली जि ठाणे.
आरोपीतांकडुन उघडकीस केलेले गुन्हे:-
१) डोंबिवली पोलीस ठाणे गु.र.क:- ९४६ / २०२३ कलम :- ३७९,३४ भा.दं.वि
२) मानपाडा पोलीस ठाणे गु.र.क :- ८४९ / २०२३ कलम: – ३७९ भा.दं.वि. सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३ कल्याण श्री. सचिन गुंजाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग श्री. सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सचिन सांडभोर, यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा ५०३ / विशाल वाघ, पोहवा १३०७ / प्रशांत सरनाईक, पो. अ ८४१३ / नितीन सांगळे, पो.शि./ ३९९८ पाटील, पो.शि./३७५८ शिर्के यांनी कामगिरी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com