घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास गोंदिया पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया : फिर्यादी कु. भाग्यश्री रमन मेश्राम 25 वर्ष, रा.पी.पी. कॉलेज रोड, आंबेडकर वार्ड, सिंगलटोली गोंदिया ही रात्र दरम्यान घरी झोपली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने दिनांक 14/04/23 चे 23.00 वा. ते 15/04/2023 चे 09.00 वाजता दरम्यान फिर्यादीचे घराचे समोरील दाराचा कडी कोंडा तोडुन

नमूद गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने, पोलीस अधिक्षक, गोदिया, श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक, गोदिंया श्री. अशोक बनकर, उपवि भागीय पोलीस अधिकारी, गोंदिया श्री. सुनिल ताजने, यांनी पो. नि. श्री. चंद्रकांत सूर्यवंशी पो. ठाणे गोंदिया शहर यांना चोरी, घरफोडी गुन्ह्यातील गुन्हेगारांचा शोध घेऊन तात्काळ गुन्हे उघडकीस आणण्याबाबत निर्देशित केलें होतें.
या अनुषंगाने मा. वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे पो. ठाणे गोंदिया शहरचे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत सूर्यवंशी, यांनी पो. ठाण्यातील गुन्हे प्रकटी करण पथकास याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे पोलीस निरीक्षक, सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनात पो. ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक चोरी, घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत होते.
गुन्हे प्रकटीकण पथक चोरी, आणि नमूद घरफोडी करणाऱ्या गुन्हेगा रांचा शोध करीत असताना पथकाने प्राप्त विश्वसनिय गुप्त बातमीच्या आधारे संशयीत इसम नामे -
1) पवन अशोक पशिने, वय 25 वर्षे, रा. भटेरा चौकी, वार्ड क्रं. 02 बालाघाट, ता. जि. बालाघाट (म.प्र.) यास ताब्यात घेण्यात आले.
ताब्यातील संशयित यास घरफोडी गुन्ह्यातील मुद्देमाल बाबत विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्यांने त्याचा साथी दार नामे- सोहेल खान, रा. बालाघाट (मप्र.)याचेसोबत मिळून चोरी केल्याचे कबुल केले आहे. आरोपी पवन पशिने यांचे जवळुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला
1)एक विवो कंपनीचा मोबाईल किमती 3000/-
, 2) सोन्याचे टाप्स 2 नग अंदाजे 3 ग्रॅम कि.अं.10,000/-रु असा एकुण 13,000/- रुपया चा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी दिनांक 24/04/2023 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून आरोपी यांचे कडून गोंदिया शहर हद्दीतील चोरी, घरफोडी चे आणखी गुन्हे उघड होण्या ची शक्यता आहे. यासंबंधा ने सुध्दा गुन्हयाचा सखोल तपास सुरू असून पो हवा. जागेश्वर उईके, पो. ठाणे गोंदिया शहर हे तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे निर्देशांन्वये पो. ठाणे गोंदिया शहर चे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटी करण पथक स. पो. नि. श्री. सागर पाटील, पो. हवा. कवलपाल सिंह भाटीया, जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, दिपक रहांग डाले, सतिश शेंडे, ओमेश्वर मेश्राम, प्रमोद चव्हाण, मपोहवा. रिना चौव्हाण, पोशि. दिनेश बिसेन, मुकेश रावते, पुरुषोत्तम देशमुख, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार यांनी केलेली आहे.