डोंबिवली पोलीसानी केली एका अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका…

उपसंपादक-रणजित मस्के

डोंबिवली :डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्र 139/23 भा द वि क.363 मधील 14 वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याबाबतची तक्रार मुलीचे वडिल श्री राजन देवनाथ प्रजापती वय 37 वर्ष धंदा -सुतार, रहा. रुम नंबर 07 , दिनानाथ गजानन चाळ, लक्ष्मण रेषा, जुना आयरेगाव डोंबिवली पूर्व यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर गुन्हाचा तपास सपोनि सानप व तपास पथक यानी केला.
तपास करत असताना सदर अपहरण करणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकास व बळीत मुलीस तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही च्या आधारे बनेली, टिटवाळा येथून शोधून अल्पवयीन मुलीला सुखरूप तिच्या पालकांच्या ताब्यात देऊन विधीसंघर्ष ग्रस्त बालकाला रिमांड होम मध्ये रवाना केले
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com