माणगांवमध्ये ६ म्हैस जातीच्या जणांवराची तस्करी करून अवैध वाहतूक करणाऱ्याच्या आवळल्या माणगांव पोलिसांनी मुसक्या
प्रतिनिधी:-सचिन पवार
माणगांव :-माणगांव तालुक्यातील काही वर्षी सुरु असलेल्या पाळीव प्राण्याची तस्करी करून कत्तल ह्या गोष्टीना पुन्हा सुरुवात झाल्याची घटना सुरु केली आहे. अशा प्रकारे ६ म्हैस जातीच्या जनावराची अवैध वाहतूक करणारा टेम्पो मानगांव पोलिसांनी दि.१८ एप्रिल रोजी रात्री १२. वाजण्याच्या सुमारास पकडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं आहे की मुबंई गोवा महामार्गावरून जनावरची अवैध वाहतूक होणार आहे अशी गुप्त माहिती मिळताच माणगांव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पो. स. ई. अस्मिता पाटील, पो. शि. शिवाजी मिशाल, पो. ह. दर्शन दोडकुलकर, पो शि. विनय पाटील यांनी सापळा रचून इंदापूर बायपास रोडवर अशोका लेयलंड कपंनीचा टेम्पो क्रमांक एम एच ०३ सी व्ही.९६२४ हा पांढऱ्या रंगाचा पाठच्या बाजूने ताडपत्रीने बांधलेला अडवला व त्यामध्ये 2 प्रवास करणारे व चालकास विचारलं तसेच पाहणी केली असता त्याच्यात ६ म्हैस १ लाख १० हजार किमतीची छोटी मोठी जातीची जनावरे तसेच ३ लाख रुपयाचा टेम्पो एकूण ४ लाख १० हजार किमतीचा मु्देमाल व या घटनेतील आरोपी प्रेमकुमार परमेश्वर सुर्यवंशी वय वर्ष २८ रा कल्याण बाजारपेठ मुंबई व समीर निजाम कुरेशी वय वर्ष २० रा. गोवडी मुबंई यांना माणगांव पोलिसांनी घेतले ताब्यात या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात झाली असून आरोपी यांच्या विरोधात कॉ गु रजि नं १२०/२०२३ भा द वि स कलम ३७९,३४ प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ -५ अ,५ ब,९अ,११ प्राण्याच्या छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०,११(१)(अ ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटिल यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस सब इन्स्पेक्टर अस्मिता पाटील करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com