महाड एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक युनिट चारमध्ये चोरी 1 तासांत मुद्देमालासह 4 चोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंंपााक-राकेश देशमुख

महाड : महाडएमआयडीसीतील कारखान्यांमध्ये चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मागील काही दिवसापूर्वी एमआयडीसीतील कारखान्यामध्ये चोरी झाली असता त्या चोरीतील आरोपींना देखील एमआयडीसी पोलिसांनी काही तासातच अटक केली होती. काल दिनांक 15 एप्रिल रोजी महाड एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज युनिट चार मध्ये स्टेनलेस स्टील पाईप ची चोरी झाली होती. प्रशांत भरत महाडिक यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या एक तासांमध्ये चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींकडून 63 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपींवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शत्रुघन रामनारायण निसार वय 26, अमित कुमार राजकुमार चौधरी वय 21, रुदल दौलत यादव वय 26, लालाभाई राम सनेही सिंग वय 44, सर्व सध्या राहणार देशमुख कांबळे,महाड,, मूळ राहणार उत्तर प्रदेश अशी चारही आरोपींची नावे असून या आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डीडी ढेपे हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट