शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून घरातील चोरीचा गुन्हा उघड महिलेस ताब्यात घेवन सोन्याचे दागिण्यांसह रोकड जप्त…
उपसंपादक – रणजित मस्के
सातारा : शाहूपुरी पोलीस ठाणे येथे दि. 10/04/2023 रोजी गुरुज्योती अपार्टमेंट रामचा गोट, सातारा येथील कुटुंब यात्रेनिमित्त घर बंद करून चावी शेजारी ठेवून गावी गेले असताना त्यांचे परामधील कपाटामध्ये ठेवलेले अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व 16,000/- रु.ची रोख रक्कम चोरीस गेले बाबत शाहूपुरी पोलीस ठाणत तक्रार प्राप्त झाली होती. त्यांचे तक्रारी वरुन शाहुपूरी पोलीस ठाणे गुरनं. 105/2023 भादविसंक, 380 प्रमाणे घरातील चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा दाखल झाले नंतर मा. पोलीस अधीक्षक, सो, सातारा मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस

अधीक्षक श्री. बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश किंद्रे यांनी पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे यांना सदरचा
गुन्हा उघडकीस आणणे बाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे मा. पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण
शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत बधे व अंमलदार यांना नमुद गुन्हा उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन करून सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे शाखच अमलदार हे संशयीत व्यक्तीकडे विचारपुस करीत असताना माहिती प्राप्त झाली की, यापूर्वी चोरीची तक्रार दाखल असलेली महिला हि त्याचे अपमिंटमध्ये राहणेस आली आहे. त्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी महिला अंमलदार यांचे मदतीने सदर महिलेस चौकशीकामी पोलीस ठाणेस घेवून आले. नमुद महिलेकडे महिला अंमलदार यांचे मार्फतीने चौकशी करीत असताना सदरची महिला हि उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे देत होती. त्यामुळे तीस विश्वासात घेवून तीचेकडे कौशल्यपूर्वक विचारपुस केली असता तीने नमुद गुन्हा केल्याची व सदरचे सोने गहाण ठेवल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे संशयीत सोनार व्यक्तीस ताब्यात घेवून त्याचेकडे चोरीस गेलेले 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे हस्तगत केले, तसेच सदर महिलेकडुन चोरीतील 16000/- रुपये रोख रक्कम हस्तगत करून सदरचा चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार चंद्रकांत माने हे करीत आहेत.
अशा प्रकारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदर गुन्हयाचा सलग तपास करून चोरट्या माहिलेस व सोनारास ताब्यात घेवून त्यांचेकडुन गुन्हयामध्ये चोरीस गेलेले 25 ग्रॅम बजानाचा सोन्याचा राणीहार व 16,000/- रु.ची रोख
असा मुद्देमाल हस्तगत करून, 24 तासाचे आत चोरीचागुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश किद्र, पीलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत बधे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लेलेश फडतरे, चंद्रकांत माने, सचिन माने, पोलीस नाईक अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार पादव, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पवार, स्वप्निल पवार तसेच माहिला अंमलदार माधुरी शिंदे, शुभांगी भोसले, कोमल पवार, तनुजा शेख यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com