मनसेच्या वाहतूक सेनेच्या विद्यमाने ताडदेव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न…
संपादक- दिप्ती भोगल
ताडदेव: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष आदरणीय श्री. राज साहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या विद्यमाने आदरणीय श्री. संजय भाई नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि आदरणीय सरचिटणीस आरिफ भाई शेख यांच्या मार्गदर्शनाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मलबार विधानसभा, वॉर्ड क्रमांक २१५, स्थान : सिंहगड हौसिंग सोसायटी, तळ मजला, ताडदेव , राम भंकाळ पथ येथे दिनांक ०९ एप्रिल २०२३ रोजी वेळ : सकाळी ०९:०० ते ०२:०० या वेळेत संपन्न झाला.



महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष आदरणीय श्री संजय भाई नाईक आणि महिला सरचिटणीस सौ. सुप्रिया ताई दळवी यांनी शिबिराला भेट देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मलबार हीलचे सर्वेसर्वा माननीय डॉक्टर श्री. रितेश मेस्त्री (महाराष्ट्र चिटणीस – वैद्यकीय विभाग – जनहित) यांचे खास सहकार्य लाभले.




तसेच मलबार हीलचे विभाग अध्यक्ष श्री. निलेश शिर्धनकर आणि महिला विभाग अध्यक्ष सौ. सरोजताई बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. ॲड. मुकेश भालेराव – शाखा अध्यक्ष २१४ , श्री. विनोद सरवदे – शाखा अध्यक्ष २१५, श्री. अंकुर लाड – विद्यार्थी सेना, श्री. परेश मोघे – उपशाखा अध्यक्ष प्रभाग २१८, वरळी चे जिल्हा अध्यक्ष श्री. कमल पाटील उर्फ के.पी. राजे, नितीन आव्हाड – उपशाखा, श्री जीतू निर्मल – उपशाखा अध्यक्ष, अध्यक्ष, भाई मांजरेकर – गटाध्यक्ष, श्री. निलेश शिंदे – उपशाखा अध्यक्ष, श्री. नारायण निकम – उपशाखा, श्री. हसमुख मारू – उपशाखा अध्यक्ष, श्री. जीतू गोंजी – कार्यालय अध्यक्ष, श्री. मुकेश मोहिते – महाराष्ट्र सैनिक, माँटी भाई – महाराष्ट्र सैनिक, श्री. हरीश शेलार – महाराष्ट्र सैनिक, श्री. बाबू आंगणे – महाराष्ट्र सैनिक, सौ. अरुणा मारू – शाखा अध्यक्ष, कू. दुर्गा शेलार – शाखा अध्यक्ष, सौ पूजा राजपूत – महाराष्ट्र सैनिक , सौ. तृषाली घाडी – महाराष्ट्र सैनिक, कु मंगला पाटकर – महाराष्ट्र सैनिक, सुनीता मांगेला – महाराष्ट्र सैनिक, श्रीमती विजया पाटकर सौ. सुप्रिया गांधी आणि पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिक यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
रक्तदान शिबिराला स्थानिक रहिवासी रक्तदातांचा चांगला प्रतिसाद मिळाला.तसेच सिंहगड सोसायटीचे अध्यक्ष श्री. नाना कदम, सेक्रेटरी श्री. प्रकाश कुटे, खजिनदार श्री. एकनाथ कोकाटे यांनी रक्तदान शिबिर राबविण्यास खूप मोलाचे सहकार्य केले .तसेच महत्मा गांधी ब्लड बँके चे संस्थापक डॉक्टर श्री किशोर झा तसेच त्यांच्या सर्व स्टाफचे आभार महाराष्ट्र सैनिक सौ.शितल घाणेकर यांनी मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com