डहाणूहून सकाळी 9. 37 ला सुटून विरारला सकाळी 10. 47 ला पोहोचणारी 93010 लोकल विरार ऐवजी बोरीवली पर्यंत न्यावी महिलांची डी आर यु सी सी चे सदस्य केदार काळे यांच्याकडे निवेदन…
प्रतिनिधी-महेश वैद्य
पालघर: पालघर दिनांक 6 एप्रिल 2023 :-
दैनंदिन रेल्वे प्रवाशांना मुंबईकडे जाणाऱ्या लोकल अत्यंत अल्प आहेत आणि ज्या आहेत त्यातल्या बहुतेक लोकल या विरार पर्यंत जातात.

डहाणूवरुन सुटणारी 93010 लोकल विरार ऐवजी बोरीवली पर्यंत न्यावी अशी मागणी दैनंदिन रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांनी आज रेल्वे कडे केली .
त्यासाठी डी आर यु सी सी सदस्य केदार काळे यांच्याकडे त्यांनी त्याबाबत , शंभर पेक्षा जास्त महिलांनी सह्या केलेले निवेदन दिले .
खासदार श्री राजेंद्र गावित साहेब व मी स्वतः ही मागणी जनरल मॅनेजर -डीआरएम यांच्याकडे करू व त्यांनी मान्य न केल्यास , भारताचे रेल्वेमंत्री व रेल्वे बोर्डाकडेही आपली मागणी पुढे नेऊ .
पुढे केदार काळे म्हणाले दैनंदिन रेल्वे प्रवासाना प्रवास करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे .
डहाणूहुन मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या खूपच कमी आहेत. कोविडमध्ये बंद पडलेली डहाणू सकाळी 7.5 सुटणारी गाडीही बंद आहे . ती सुरू करावी म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. तसंच डहाणू ते चर्चगेट हा उपनगरी रेल्वेचा भाग आहे राजधानी सोडून इतर गाड्यांसाठी लोकल साईडला काढू नयेत असा नियम असतानाही .
रेल्वे प्रशासन रोजच काही लोकल केळवा रोड इतर रेल्वे स्टेशनवर साईडला काढतात त्या बंद कराव्यात म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत .
तसंच रात्री बोईसरून सुटणाऱ्या दुसऱ्या पाळीतील कामगारांना विरार कडे जाणारी गाडी नाही तीही सुरू व्हावी म्हणून प्रयत्नशील आहोत. रेल्वेचे विरार डहाणू असे दोन ट्रॅकचे काम प्रगतीपथावर आहे , आपण आशा करू ते लवकरात लवकर होईल आणि डहाणू विरार किंवा डहाणू चर्चगेट गाड्या मोठ्या प्रमाणात सुरू होतील .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com