टेमघर येथील वर्कशॉपमध्ये लाखो रुपयाच्या मुद्देमालाची चोरी, चार आरोपींना अवघ्या दोन तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
उपसंपादक-राकेश देशमुख
महाड: पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 6 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी लोखंडी खिडकी तोडून वर्कशॉप मधून किमती मुद्देमालाची चोरी केली होती. वर्कशॉप मालक अख्तर पठाण यांनी तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या दोन तासामध्ये महाड एमआयडीसी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. सुमारे एक लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरांकडून हस्तगत करण्यात आला. आरोपी नितीन कृष्णा बिरवाडकर रा. बिरवाडी, कुंभारवाडा, राहुल संजय पोळ रा. कुडली- पोलादपूर, सागर दिनेश शेडगे रा. बिरवाडी, अक्षय मोहन उलालकर रा. बिरवाडी असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. गोरेगावकर हे करीत आहेत. चोरीचा मुद्देमाल विकत घेणारा देखील चोरच असतो तसेच आरोपींनी चोरी केलेला मुद्देमाल नक्की कोणत्या भंगारवाल्याने विकत घेतला आहे याचा तपास देखील काही तासात लागणार असल्याचे समजते. चोरीचा माल विकत घेण्यासाठी भंगारवाल्यांनी गोदामामध्ये अड्डा बनवला आहे का असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com