दरोडा व जबरी चोरीचे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीला मानपाडा पोलीसांनी ०२ तासात केली अटक…
उपसंपादक-रणजित मस्के
मानपाडा : फिर्यादी श्री. राजन पारस चौधरी, वय २२ वर्षे, व्यव ओला कार चालक, रा. गोवडी, मुंबई हे दिनांक २४/०३/२०२३ रोजी त्यांचे स्वीफ्ट डिझायर कार घेवुन नेवाळी नाका, बदलापुर पाईप लाईन रोड, कल्याण पुर्व या ठिकाणी आले असता, त्यांना रात्रौ ०३:०० वा. चे सुमारास नेवाळी येथून डोंबिवली येथील भाडे आल्याचा कॉल ओला कंपनीकडुन आला, त्याप्रमाणे त्यांनी नेवाळी, कल्याण पुर्व येथुन तीन पॅसेंजर यांना घेवुन डोंबिवली येथील घारडा सर्कल या ठिकाणी आले असता, त्यांचे कारला एका रिक्षाने कट मारला व रिक्षा त्यांचे कारचे पुढे उभी केली, रिक्षातुन दोन इसम खाली उतरुन ते फिर्यादी यांचे गाडीजवळ येवुन त्यांचेशी वाद करू लागले, त्यावेळी फिर्यादी हे कारमधुन खाली उतरले असता, सदर इसमांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन त्यांचे खिशाची तपासणी करु लागले, त्यावेळी फिर्यादी हे त्यांचे कारमध्ये बसण्याचा प्रयत्न करीत असताना, कारमध्ये बसलेले तीनही इसम खाली उतरले व ते देखील फिर्यादी यांचेशी वाद करु लागले, त्यावेळी सदर पाचही इसमांनी फिर्यादी यांना मारहाण करुन त्यांचे पॅन्टचे खिशातील पाकीट जबरीने काढून ते पाचही जण रिक्षातून पळुन गेले. त्यानंतर फिर्यादी हे कारमध्ये बसले असता, त्यांनी कारमध्ये ठेवलेले त्यांचे दोन मोबाईल फोन कारमध्ये नव्हते. सदरचे मोबाईल फोन कारमध्ये बसलेल्या तीनही पॅसेंजरांनी चोरी करुन नेल्याचे फिर्यादी यांना आढळुन आले.

सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिनांक ०१/०४/२०२३ रोजी मानपाडा पोलीस ठाणेत दिलेल्या फिर्यादीवरुन मानपाडा पो.स्टे. गुरनं २३४ / २०२३ भादविक ३९५ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन, मानपाडा पोलीस ठाणेचे वपोनिरी. शेखर बागडे यांनी लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळ्या टीम तयार करून, त्यांना गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले. सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासात आरोपीत नामे चंद्रकांत उर्फ मोठा चंद्या रमेश जमादार, शिवा रुषीपाल तुसंबल, सत्यप्रकाश मुकेशकुमार कनोजिया यांना अटक करण्यात आलेली असुन, एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले असुन, एका पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध चालु आहे. नमुद आरोपीत यांचेकडे केलेल्या तपासात त्यांनी गुन्हयात चोरलेली रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच इतर गुन्हयात चोरलेले एकंदर ९ मोबाईल फोन, ०१ लॅपटॉप, रोख रक्कम, फिर्यादीचे ओळखपत्रे, गुन्हयात वापरलेली रिक्षा असा एकुण २,००,०००/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींकडुन जप्त करण्यात आलेल्या मोबाईल व लॅपटॉपचे संबधाने तपास चालू असुन सदरचे आरोपीत हे सराईत गुन्हेगार असुन, त्यांचेविरुध्द डोंबिवली, टिळकनगर, खडकपाडा, हिललाईन पोलीस ठाणेत खुन, दरोडा, दरोडयाची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दुखापत, सरकारी नोकरास दुखापत, अवैध शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदरचे आरोपीत हे गुन्हयात रिक्षाचा वापर करुन रस्त्याने जाणारे वाहनांना कट मारून, वाहन चालकांशी वाद घालुन त्यांना लुटण्याचे तसेच रिक्षात एक प्रवासी बसवुन त्यास एकांत ठिकाणी नेवुन त्यास लुटण्याचे गुन्हे करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदर गुन्हयाचा अधिक तपास चालू आहे. सदरचा गुन्हा ०२ तासाचे आंत उघडकीस आणण्यात मानपाडा पोलीस ठाणेचे पोलीसांना यश मिळालेले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुप्रावि कल्याण श्री. दत्तात्रय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण श्री. सचिन गुंजाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग श्री. सुनिल कुराडे, वपोनि श्री. शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनिरी. गुन्हे श्री. बाळासाहेब पवार, सपोनिरी. सुरेश डाबरे, सपोनि / अविनाश वनवे, सपोनि / सुनिल तारमळे, सपोउपनि / भानुदास काटकर, पोहेकॉ / विकास माळी, पोहेकॉ / सुनिल पवार, पोहेकॉ / संजय मासाळ, पोहेकॉ / गिरीश पाटील, पोकों / अशोक आहेर, पोकॉ/ विजय आव्हाड यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com