सातारा जिल्हयातील शरिराविरुध्दचे गुन्हे करणारी सराईत टोळी सातारा पोलीसांनी केली तडीपार…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा : सातारा शहरात गर्दी मारामारी, दुखापत, शिवीगाळ दमदाटी, जबरी चोरी, घरात घसून दुखापत करणा-या टोळीचा प्रमुख १) सौरभ ऊर्फ लाल्या नितीन सपकाळ, वय २३ वर्षे रा. रघुनाथपुरा पेठ, करंजे सातारा ता जि सातारा २) ओंकार रमेश इंगवले, वय २७ वर्षे, रा. देशमुख कॉलनी करंजे पेठ, सातारा ता जि. सातारा (टोळी सदस्य) ३) मंदार हणमंत चांदणे, वय ३२ वर्षे, रा. ७४१, गुरुवार पेठ, सातारा वा जि सातारा (टोळी सदस्य) यांना जिल्हयातून तडीपार करणे बाबत सातारा शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक श्री. बी. बी. निबाळकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५ अन्वये प्रस्ताव सादर केला होता. त्याची चौकशी श्री एम. डी. शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा शहर विभाग यांनी करून त्याचा अहवाल मा. हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांना सादर केला होता.

प्रतिबंधक कारवाई करुनही सदर टोळीच्या संशयित हालचालीस प्रतिबंध झालेला नाही, त्यांचे कृत्यांमुळे सर्व सामान्य नागरीकांचे फार मोठे आर्थिक व शारिरीक नुकसान झाले आहे. हद्दपार यांना कायदयाचा धाक नमुन ते बेकायदेशीर कारवाया करीत आहेत. त्यांना सुधारणेची संधी देचूनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमथुन त्याचेवर कडक कारवाई करणे करीता मागणी होत होती, म्हणून त्यांना समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ अन्वये ०३ इसमांचेवर दोन वर्षा करीता सातारा जिल्हा हद्दीतुन हदपारचा आदेश केला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासुन ०६ उपद्रवी टोळयांमधील १६ इसमांना तडीपार करण्यात आले आहे.. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.

या कामी हदपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाचे वतीने अपर पोलीस अधीक्षक, श्री. बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. मधुकर गुरव, पो.ना.प्रमोद सावंत, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला. या कारवाईचे सर्व स्थरातून समाधान व्यक्त होत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट