Phone pay वर चुकीचा नंबर टाकून आलेली रक्कम परत करण्याऱ्या प्रामाणिक सरफराजचा विशेष सन्मान…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा : phone pay वर एक payment करत असताना number चुकीचा enter झाला व खात्यावरून 50,000 /- अमाऊंट दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर जमा झाली .ह्या अकाउंट ची माहिती घेतली असता सदर तरुण 11वीत शिकणारा ‘सर्फराज जमीर पटेल’राहणार कन्हेरी ता खंडाळा जि सातारा युवकाच्या खात्यावर जमा झाली.

सर्फराज ला contact केला असता त्याला चुकून हि रक्कम तुमच्या खात्यावर आली असे सांगितले त्यावर सर्फराज बोलला कि ” पैसे आले आहेत, मी दोन दिवसांपूर्वीच अकाउंट नवीन उघडले आहे, माझ्याकडं atm नाहीय तुम्ही इकडे या तुम्हला बँकेतून काढून पैसे रिटर्न करतो” असं सांगितले .

सर्फराजने ही बाब त्याच्या वडिलांना जमीर पटेल याना सांगितली त्यांनीही ज्यांचे पैसे आपल्या मुलाच्या खात्यावर आलेल्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करून सांगितले कि ,”काही काळजी करू नका, तुम्हाला तुमची सगळी रक्कम परत करतो” असे सांगत माणुसकी काय असते हे दाखवून दिले . दिनांक ४ मार्च २०२३ रोजी सर्फराज चे वडील जमीर पटेल यांनी बँकेत जाऊन संपूर्ण रक्कम nft केली.त्यांचा हा प्रामाणिकपणा मनाला खूप भावला मनात कोणत्याही प्रकारे पैशाचा मोह न ठेवता 50 हजार रुपये संपूर्ण रक्कम परत केली त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.अशा ह्या सर्फराजचे पोलीसांनी विशेष आभार मानले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट