साईकृपा सद्गुरु फाउंडेशन ऑल इंडिया तर्फे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन संपन्न…
संपादक- दिप्ती भोगल
शिवडी : दिनांक २/४/२०२३ रोजी रविवार शिवडी विभाग इंदिरानगर येथे साईकृपा सद्गुरु फाउंडेशन एनजीओ ऑल इंडिया संस्थापक अध्यक्ष. सूर्यकांत भाऊ गुणाजी गावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवडी विभाग लक्ष्मीताई फुलचंद वर्मा सुभाष भाऊ जितेंद्र पटेल या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आराम बालवाडी येथील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या विशेष सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आला.


यासाठी उपस्थित उमेश भाऊ, विद्यान भाऊ, खुर्शिद भाऊ, संजय भाऊ, रितिक भाऊ ,विदिशा ताई रामाने ,गणेश भाऊ इत्यादी अनेक मित्रपरिवार उपस्थित होते.

तसेच शिवडी विभाग आणि आरंभ बालवाडी ह्या सर्वांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत भाऊ आणि सर्व आलेल्या कार्यकर्त्यांच सत्कार करण्यात आला.
अशी समाजसेवा सर्वांनी करत रहा, समाजसेवा हाच खरा धर्म असे यावेळी सुर्यकांत गावणकर यानी सांगितले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com