नडगाव हद्दीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर चार वाहनांचा विचित्र अपघात…

0
Spread the love

प्रतिनिधी-राकेश देशमुख

नडगांव: आज दिनांक 27 मार्च 2023 रोजी साडेअकरा वाजताच्या दरम्यान मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगाव जवळ चार वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन पिकप, एक स्कॉर्पिओ व एक केटीएम दुचाकी यांचा समावेश आहे. स्कॉर्पिओ, पिकप व केटीएम दुचाकी पोलादपूर करून महाडच्या दिशेकडे जात असताना समोरून येणाऱ्या पिकअपने पहिल्यांदा दुचाकीला जोरदार धडक दिली व नंतर स्कॉर्पिओ व पिकप वर आदळला. यामध्ये दूचाकी ची परिस्थिती मात्र विचित्र झाली आहे. दोन्ही दुचाकी स्वार गंभीरित्या जखमी झाले असून त्यांना महाड ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी महाड एमआयडीसी पोलीस दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट