सुहित जीवन ट्रस्टच्या गतिमंद मुलांची बौद्धिक आणि शैक्षणिक प्रगती कौतुकास्पद – अतुल झेंडे
उपसंपादक – रणजित मस्के
पेण : गतिमंद मुलांकडील बौध्दीक आणि शैक्षणिक प्रगती वाढविण्याचा दृष्टिकोन त्यांच्या पालकांसह शाळेचे शिक्षक चांगल्या पद्धतीने ठेवत असल्याने त्यांचे कलाविष्कार पाहता कौतुकास्पद वाटत असल्याचे गौरवोद्गार रायगड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पेण येथे काढले. पेण येथील गतिमंद मुलांची शाळा सुहित जीवन ट्रस्ट व नेनेज कराओके स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चैत्र पाडव्याच्या दिना निमित्त जल्लोष २०२३ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने, बाळ न्याय मंडळ न्यायाधीश अॅड.. भूषण जंजिरकर, आले.



डॉ. नीता कदम, सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा पाटील, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना अतुल झेंडे म्हणाले की, या मुलांचा उत्साह पाहता त्यांच्या जीवनात शाळेमुळे एक वेगळाच आनंद त्यांना मिळत आहे. त्यामुळे या मुलांना सुहीत जीवन ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक आनंद मिळत असल्याने हेच खरे त्यांचे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सदर विद्यार्थ्यांसह पालकांचे गुणगौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com