तीन वर्षापासून बंद असलेली पोलीस सबसिडी कॅन्टीन गुढीपाडवा निमित्त पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब व मा.राहुल दुबाले अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्या प्रयत्नातून अखेर सुरू…
उपसंपादक – रणजित मस्के
बीड : विशेष मदत म्हणजे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर साहेब यांनी वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा करून पोलीस परिवारांना सवलतीच्या दरात दैनंदिन जीवनात लागणारे वस्तू कशा उपलब्ध होतील यासाठी पाठपुरावा केला विशेष म्हणजे पोलीस कॅन्टीन चा शुभारंभ पोलीस पत्नी व पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व गुलाल लावून करण्यात आला या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक सहपरिवार उपस्थित होते .



कोरोना काळाच्या अगोदर पासून ही पोलीस कॅन्टीन बंद पडली होती पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब यांना सुरू करण्याबाबत विनंती केली साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आज ही कॅन्टीन जिल्ह्यातील पोलीस परिवारांसाठी सुरू झाली पोलिसांच्या हिताच्या कामात आणखीन एक भर पडली आणि आणखीन एक काम आपल्या हातून घडलं याचा समाधान आहे सर्वांनी या कॅन्टीनचा लाभ घ्यावा या कार्यक्रमांमध्ये होम डिवाइस पी शिंदे साहेब शहरांमधील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आरसीबी चे कर्मचारी पोलीस परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा सन्मान केला त्या बद्दल मी पोलीस अधीक्षक साहेबांचे आभार मानतो असे श्री राहुल अर्जुनराव दुबाले यानी सांगितले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com