मोटर सायकल चोरी करणाऱ्या एका आरोपीला डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; चोरीची ७०,०००/-किमतीची मोटरसायकल डोंबिवली पोलिसांनी केली हस्तगत
उपसंपादक – रणजित मस्के
डोंबिवली दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी ११.३० वा ते १२.००वा सुमारास देवराज मेघाजी बारवाडी हा ४४ वर्षीय व्यक्ती त्याच्या वैयक्तिक कामानिमित्त सारस्वत बँक डोंबिवली पूर्व येथे गेला असता त्याची मोटरसायकल स्कुटी सुझुकी एक्सेस गाडी क्रमांक एम एच-०४ के के- ५२७६ अंदाजे किंमत ७०,०००/-रुपये ही दुचाकी बँकेच्या मुख्य दरवाजा समोरून एका अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली. दिलेल्या चोरीची घटना घडताच देवराज यांनी नजीकच्या पोलीस ठाणे येथे गाडी चोरीची तक्रार दाखल केली सदर तक्रारीवरून डोंबिवली पोलिसांकडून गुन्हा नोंद क्रमांक ७२/२०२३ कलम ३७९भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सनप पोलीस हवालदार वाघ,भंणगे, लोखंडे/ पोअं राठोड गवळी यांच्या पथकाने त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज द्वारे पाहणी करून अथक प्रयत्न करून चोरीला गेलेली सुझुकी एक्सेस मोटर स्कुटी डोंबिवली पूर्व लोढा या ठिकाणी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेऊन त्याला अटक केले आहे व त्याच्याकडून नमूद गुन्हेतील चोरीस गेलेले मोटरसायकल स्कुटी सुझुकी एक्सेस हे हस्तगत करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोलीस निरीक्षक गुन्हे तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पथकाने केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com