मा. पोलीस महासंचालक यांचे हस्ते मि. भा.व.वि. पोलीस आयुक्तालयांतर्गत नायगांव पोलीस ठाण्याचे उद्घाटन…
उपसंपादक – रणजित मस्के
नायगाव : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत आज दिनांक १०/०३/२०२३ रोजी मा. श्री. रजनिश सेठ, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे हस्ते नायगांव पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले. वालीव पोलीस ठाणे हद्दतील वाढती लोकसंख्या व त्यामुळे वाढलेल्या गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करणे आवश्यक झाले होते.



मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत सध्या १६ पोलीस ठाणे कार्यान्वित असून नवीन नायगाव पोलीस ठाण्याच्या निर्मितीनंतर आता १७ पोलीस ठाणे कार्यरत असणार आहे.




नवीन नायगाव पोलीस ठाण्याची निर्मिती वालीव पोलीस ठाणे हद्दीचे विभाजन करुन करण्यात आली आहे. नवीन नायगाव पोलीस ठाणे कार्यान्वित झाल्याने सदर भागामध्ये गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण येवून गुन्हेगारीस आळा बसणार आहे तसेच परिसरातील नागरिकांना पारपत्र पडताळणी, चारित्र्य पडताळणी या सारख्या अत्यावश्यक सेवांचा लाभ तत्परतेने घेता येईल, व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढेल.
नायगाव पोलीस ठाणे अंतर्गत
पुर्वेस :- नागले गांव ते पुढे ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीपर्यंत, कामण, मोरी, पोमण, शिल्लोत्तर, देवदल, चिचोटी, शारजामोरी, कोल्ही, पाळणापाडा, आशानगर, खुताडीपाडा, मोरी गावची डोंगररांग, कामण चिचोटी गावचा अभयारण्य परिसर.




पश्चिमेस :- नायगांव रेल्वे स्टेशनकडील पूर्व बाजू, परेरानगर, स्टारसिटी, डॉन बॉस्को, ज्युचंद्र परिसर
दक्षिणेस:- बसवा ते नायगाव खाडीचा उत्तरेकडील भाग, मालजीपाडा, ससूनवघर, ससूपाडा, वर्सोवा ब्रिज, काशिमिरा पोलीस ठाणे हद्दपर्यंत.
उत्तरेस :- टियरी गांवची हद्द नवकार सिटी फेस-३, चिचोटी नाका ब्रिज संपेपर्यंत मुंबई अहमदाबाद
महामार्गाच्या दोन्ही बाजू, बापाने गावची हद्द, कोल्ही गावची हद्द, सातीवली गावचे हद्दीपर्यंत असे
कार्यक्षेत्र आहे.
नायगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रमेश भामे हे कामकाज पाहणार असून त्यांचा संपर्क क्रमांक ८६५२१७४९९९, ०२५० – २९९११५६ व मेल आयडी pi.naigaon.mb v@mahapolice.gov.in असा आहे. दैनंदिन कामकाजाकरीता १४ पोलीस अधिकारी, ४३ पोलीस अंमलदार व २८ म.सु.ब. कर्मचारी असे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे.
मा. पोलीस महासंचालक यांनी उपस्थित नागरिक, पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेशी संवाद साधून नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार असल्याबाबत खात्री व्यक्त करुन पोलीसांनी जनतेच्या रक्षणासाठी व गुन्हेगारी वृत्तींना आळा घालण्यासाठी सदैव तत्पर राहून कर्तव्य करावे याबाबत मार्गदर्शन केले.
नायगाव पोलीस ठाणे उद्घाटन प्रसंगी मा. खासदार श्री. राजेंद्र गावीत, पोलीस आयुक्त श्री. मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त श्री. श्रीकांत पाठक, पोलीस उप आयुक्त श्री. अविनाश अंबुरे, श्री. प्रकाश गायकवाड, श्री. सुहास बावचे, श्रीमती पोर्णिमा चौगुले, इतर मान्यवर व्यक्ती, नागरिक व पोलीस अधिकारी / अंमलदार उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com