दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने बेकायदेशीररित्या धारदार घातक चॉपर बाळगणा-या तडीपार इसमांस केले हत्यारासह जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नाशिक : मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालयात नाशिक शहर हद्दीत अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळणारे इसम / गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याकरीता दरोडा व शस्त्र विरोधी पथक तयार / निर्माण करून कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने मा. श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री वसंत मोरे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) नाशिक शहर यांनी अवैध अग्नीशस्त्र बाळणा-या गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

दिनांक १०/०३/२०२३ रोजी दरोडा व शस्त्र विरोधी पथक, गुन्हे शाखा, नाशिक शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे पोलीस ठाणे हददीत पेट्रोलींग करून तसेच गोपनिय बातमीदारांना भेटुन गुन्हेगारांची माहिती काढत असतांना दरोडा व शस्त्र विरोधी पथकाचे पो. हवा. १०३३ सुर्यवंशी यांना गुप्त बातमीदार याचे कडुन बातमी मिळाली की भद्रकाली पोलीस स्टेशन कडून हद्दपार झालेला इसम नामे मोहम्मद अन्वर सैय्यद हा त्याचेकडे धारदार शस्त्र असून तो उपनगर हददीतील शिवाजी नगर पंचक येथे येणार असल्याची बातमी मिळाल्याने सपोनि / किरण रोंदळे यांनी लागलीच सदरची बातमी मा. वरिष्ठांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व शस्त्र विरोधी पथकातील पोलीस अंमलदार यांनी सापळा रचून इसम नामे मोहम्मद अन्वर सैय्यद वय २८ रा. स्वामी समर्थ अपार्टमेंट २रा मजला रूम न. ९, फेमस बेकरीचे पाठीमागे, नानावली, नाशिक यास ताब्यात घेवुन सदर इसमांची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात विनाकारण बेकायदेशिररित्या ०१ चॉपर असे शस्त्र मिळुन आले. तसेच सदर इसमाने मा. पोलीस आयुक्त सो. नाशिक शहर यांनी शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश जारी केलेले असतांना सदर आदेशाचे उल्लघंन केले तसेच त्याचेवरील हददपारी आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांचे विरुद्ध उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (गुन्हे), नाशिक शहर, मा. श्री. वसंत मोरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व शस्त्र विरोधीपथक मधील सपोनि / किरण रोंदळे व पोलीस अंमलदार १) पोहवा / विजय कुमार सुर्यवंशी २) पोना / श्रीशैल सवळी ३) पोअं/ कडूबा पाटील ४) पोअं. / संदीप डावरे ५) पोअं. / प्रफुल्ल गांगुर्डे ६) पोअ / प्रविण चव्हाण ७) पोअं / विशाल जोशी ८) मपोअं. / मनिषा मल्लाह यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट