अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून अटक
उपसंपादक – रणजित मस्के
पालघर : दिनांक १३/०३/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक श्री. अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना गोपनीय बातमीदाराकडुन गुजरात राज्यातून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून महाराष्ट्र शासनाने अधिसुचनाव्दारे सुगंधी सुपारी व पान मसाला याचे वाहतुकीस / विक्रीस व साठा करणेस प्रतिबंध केलेला तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक होत असल्याची गुप्त बातमी मिळाली.

मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्री. अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी पोउपनि / सागर पाटील, नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांना पोलीस पथकासह मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील मुंबई लेनवरील दापचरी चेक पोस्ट येथे नाकाबंदी लावून चाहने तपासण्याबाबत सुचना दिल्या. त्यानुसार नाकाबंदी दरम्यान सफेद रंगाचा टाटा कंपनीचा ४०७ टॅम्पो क्र.एम.एच ०४ के.यु. ६९८४ या टेम्पोस चेक केले असता त्यामध्ये खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला.
१) ८,७१,२०० /- रुपये कि.चे एकूण २० सफेद रंगाच्या प्लॅस्टीकच्या मोठया गोण्या, १ गोणीमध्ये एकूण १० सफेद रंगाचे प्लॅस्टीकच्या छोटया छोटया गोण्या, त्यामध्ये एक छोटया गोणीमध्ये प्रत्येकी २२ पाऊच विमल पान मसाला बोलो जुबान केसरी या सुगंधी गुटखा सुपारीचे पाऊच.
२) १,५५, ५८४ /- रपये कि.चे एकूण एकूण ४ सफेद रंगाच्या प्लॅस्टीकच्या मोठया गोण्या, १ गोणीमध्ये एकूण ४ निळया रंगाचे प्लॅस्टीकच्या छोटया छोटया गोण्या, त्यामध्ये एका छोटया गोणीमध्ये प्रत्येकी ५२ पाऊच विमल पान मसाला बोलो जुबान केसरी या सुगंधी गुटखा सुपारीचे पाऊच.
३) ४२,९००/- रुपये कि.चे १ सफेद रंगाच्या प्लॅस्टीकच्या मोठी गोणी, त्यामध्ये ५ लहान सफेद रंगाच्या गोण्या, १ गोणीमध्ये प्रत्येकी ५२ पाऊच व्ही. वन तंबाखु पाऊच,
४) ९६,८००/- रुपये कि.चे ४ सफेद रंगाच्या प्लॅस्टीकच्या मोठया गोण्या, १ गोणीमध्ये एकूण ५ सफेद रंगाच्या गोण्या, १ गोणीमध्ये प्रत्येकी २२० पाऊच व्ही. वन तंबाखु पाऊच,
५) ९,००,०००/- रुपये कि.चा सफेद रंगाचा टाटा कंपनीचा ४०७ टॅम्पो क्र.एम.एच ०४ के.यु. ६९८४
जु.वा.कि.सु.असा एकुण २०,६६,४८४/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर बाबत तलासरी पोलीस ठाणे येथे ६९/२०२३ भा.द.वि.सं. कलम ३२८, १८८, २७२, २७३,३४ सह अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नियम व नियमने २०११ चेकलम २६(२), २७, (२) ई २६ (२) (अ), ३० (२) (अ) व इतर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढिल तपास पोउपनि / सागर पाटील, नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा हे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोउपनि / सागर पाटील, पोहवा / ४८६ संदीप सूर्यवंशी, पोहवा / १०५६ दिपक राऊत, पोहवा/१५७६ कैलास पाटील, पोशि/ १८१९ संदीप राजगुरे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी पार पाडली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com