कासा येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल करून आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पालघर:– दिनांक ०७/०३/२०२३ रोजी यातील फिर्यादी रोहीत पांडुरंग हजारे वय २३ वर्षे रा. मु. फलटण जि.सातारा यांनी फिर्याद दिली की, यातील फिर्यादी, मयत इसम नामे शिवराज देविदास खारतोडे वय २२ वर्षे, रा. मु. पवारवाडी, ता. फलटण, जि. सातारा व आरोपीत हे एकच गावचे रहीवासी असुन ते मजुरीचे कामासाठी मौजे निकावली येथे दुपारी १७.३० वाजता सु. मौजे निकावली गावचे हददीत सप्तश्रृंगी देवीच्या मंदीराच्या मागे स्मशान भुमीजवळील शेडमध्ये हे सोबत बसुन दारु पित असतांना यातील मयत व आरोपीत यांचेत झालेल्या भांडणावरुन आरोपीत याने मयत याचे पोटावर, डाव्या हाताच्या दंडावर व गळ्यावर चाकुने वार करुन गंभीर स्वरुपाच्या दुखापती करुन त्यास जिवे ठार मारले म्हणुन कासा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं । ४७ / २०२३ भादविसंक ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये श्री. संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा पालघर व सपोनि श्रीकांत शिंदे, कासा पोलीस ठाणे यांना वेगवेगळी तपास पथके तयार करून तपासाबाबत सुचना दिल्या.

सदर पथकांपैकी पोउपनि सागर पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पालघर या पथकाने तांत्रीक पुराव्यांच्या आधारे कोणतेही धागेदोरे नसतांना सखोल व कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपी वय ४० वर्षे, रा. पवारवाडी, ता. फलटण जि. सातारा यास वसई येथून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता आरोपी याने खून केल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्याचा अधिक तपास हा सपोनि श्रीकांत शिंदे, कासा पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कामगीरी ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये श्री. संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा पालघर व सपोनि श्रीकांत शिंदे, प्रभारी अधिकारी कासा पोलीस ठाणे, पोउपनि / सागर पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पो.हवा./१०५६ दिपक राउत, पो.हवा./१५७६ कैलास पाटील नेमणुक स्थागुशा, तसेच कासा पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट