रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य – लातूर विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनचा विशेष सम्मान…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

लातूर :-प्रतिष्ठानच्या संस्थापक / अध्यक्षा मा.अश्विनी ताई महांगडे व प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष मा. निलेश बाबा जगदाळे यांच्या उपस्थितीत लातूर तालुक्यातील “शिराळा” येथे पारंपरिक वेशभूषा स्पर्धा ,नृत्य कला सादरीकरण, शिव व्याख्याने तसेच विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे अशा महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी लातूर विभागातील सर्व सदस्य, पदाधिकारी हजर होते.


यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसचालन कल्याण देशमुख यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर काळे यांनी केले तसेच अश्विनी ताईंनी सर्वांशी संपर्क साधला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री.बळवंत काळे पाटील यांना दिले होते यांनी अध्यक्षीय भाषण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सदस्य ज्ञानेश्वर माऊली काळे, राहुल गव्हाणे , मोहन माळी ,लक्ष्मण आतकरे, खंडू पवार,नितीन शिंदे,गजानन मोहिते ,कल्याण देशमुख , मयूर करदुरे,राहुल गव्हाणे ,रायबा लोभे , लक्ष्मण इंगळे,श्रीकांत देशमुख,श्रीराम शिंदे ,दयानंद बर्डे , सिताराम काळे, अरुण पारवे , सचिन दाने,प्रशांत कांबळे यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्तमपणे पार पाडला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट