मोटर सायकल चोरटा साताऱ्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या
ताब्यात…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- दिनांक ०५/०३/२०२३ रोजी सायंकाळी १८.०० या चे सुमारास मौजे नांदगाव ता जि सातारा गावचे हद्दीत बोरगाव पोलीस ठाणे डिबी पथकाचे पोलीस नाईक स्वामी पो ना ब.नं २२०२, पो ना निकम ब.नं ७८४ पो ना शिखरे च.नं २२०९ पाई पेट्रोलींग करीत असताना कृष्णा नदीवरील पुलाचे पश्चिम बाजुस पुलाच्या कठडयावर एक इसम समोरच मोटर सायकल उभी करून बसलेला होता. आम्ही त्याचे समोरुन जाण्याचे तयारीत असताना त्यास आमची चाहुल लागताच तो लगबगीने मोटर सायकल सोडून नदी काठी पळुन जात असताना त्यास पो.ना शिखरे व.नं २२०९ यांनी जागीच पकडले व त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव रोहित मधुकर गोसावी वय २० वर्षे यंदा रा.जुना बुधगावरोह वाल्मिकी आवास सांगली ता. मिरज जि. सांगली असे असल्याचे सांगुन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे ताब्यात असलेली मोटर सायकल क्रमांक एम एच ११ -डि.ई ७६५८ हि सुमारे अडिच महिन्यापूर्वी कोपर्डे ता जि सातारा येथून सकाळी ०६.०० वा चे सुमारास चोरून नेहली असुन ती तो वापरत असल्याचे सांगितले त्यामुळे नमुद कर्मचारी यांनी सदर व्यक्तिचा बोरगाव पोलीस ठाणे गुरनं ३०४/२०२२ भा.दं.वि कलम ३७९ या गुन्हयात सहभाग असल्याने सदर गुन्हयाचे तपासकामी अटक केली. व त्याचे ताब्यात मिळालेली मोटर सायकल जप्त केली.

आज रोजी सदर आरोपीस सपोनि श्री रविंद्र गजानन तेलतुंबडे व पोलीस नाईक स्वामी ब.नं २२०२ यांनी अधिक विश्वासात घेवुन त्याच्याकडे तपास केला असता त्याने व त्याचा मित्र आकाश प्रकाश चव्हाण रा जुनाबुधगावरोड वाल्मिकी वसाहत असे दोघांनी ४ महिन्यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरलेल्या मोटर सायकली विक्री करण्याकरीता एका ठिकाणी जमा केलेल्या आहेत. असे सांगुन ६ मोटर सायकली तारगाव ता कोरेगाव जि सातारा गावचे हद्दीतुन नदी काठालगत असलेल्या नदीपुल नावचे शिवारातून झाडा झुडपातून सुमारे ५,१४,०००/- किंमतीच्या एकुण ७ मोटर सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदरच्या मोटर सायकली सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतुन-१, बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतुन १. व सांगली बाजारपेठेतून ५ अशा मोटर सायकली आणलेल्या आहेत.

सदरची कारवाई हि मा. पोलीस अधिक्षक सो श्री समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा श्री किंद्रे सो यांचे मार्गदर्शनाखाली सदरील कारवाई हि, श्री रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे, पो.ना स्वामी बनं २२०२, पोहवा सावंत ब.नं ४९८, पो.ना निकम ब.नं. ७८४, पो.ना शिखरे ब.नं २२०९ पो कॉ मोरे ब.नं २३११ यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट