स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची उल्लेखनीय कामगिरी गांजाची तस्करी गुन्हयातील आरोपी ओडीशा राज्यातुन जेरबंद, तसेच मिरज येथील गुरुजी ऊर्फ हुसेन मुल्ला यास अटक…

0
स्थानिक गुन्हे अन्वेषण (2)
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सांगली : पोलीस स्टेशन सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा दाखल…

फिर्यादी संदीप आनंदा पाटील पोहेकॉ / १७६३ नेम स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली

गु. घ. ता २२.०२.२३ रोजी

गु.दा.ता वेळ २२.०२.२०१३ रोजी

माहिती कशी प्राप्त झाली

पोकों आर्यन देशिंगकर
नेमणुक :- स्वा.गु.अ. शाखा, सांगली.
कारवाई करणारे अधिकारी आणि अमलदार

मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली ,अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी, अजित टिके, यांचे मार्गदर्शनाखाली

१) पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था. गु.अ. शाखा सांगली
२) सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे स्था.गु.अ. शाखा सांगली.
३) पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर स्था. गु.अ. शाखा सांगली. जितेंद्र जाधव, राजु शिरोळकर, संदीप पाटील, मच्छींद्र बर्डे, अमोल ऐदाळे, राहुल जाधव, संकेत मगदुम, फोटोग्राफर प्रविण शिंदे, सचिन कनप, आर्यन देशिंगकर, गौतम कांबळे, अजय बेंदरे, कॅप्टन गुंडवाडे.

आरोपीचे नाव पत्ता

१. संजीव पत्रिक बेहरा, वय-२७, रा. किर्तीकी, पोस्ट पिंडीकी, जि. गजपती, राज्य ओडीशा. “

२. गुरुजी ऊर्फ हुसेन मैनुद्दीन मुल्ला, वय ४८ रा. दर्गा चौक, माळी गल्ली, मिरज

यापुर्वीचे अटक व फरार आरोपी

३. अदिल नासीर शहापुरे वय ३३ रा. बाबर गल्ली, कोल्हापूर रोड, सांगली

४. सचिन बाबासो चव्हाण वय ३१ रा. जि.प. शाळेजवळ, कवठेपिरान, ता. मिरज, जि. सांगली.

५. मयुर सुभाष कोळी वय ३३ रा. १०० फुटी रोड, डी मार्टच्या पाठीमागे, सांगली

६. मतीन रफिक पठाण वय ३१ रा. काटकर गिरणी समोर, राधाकृष्ण वसाहत, सांगली.

७. कुमार प्रभा लिमा ऊर्फ राजु भाई, रा.गुहुरी, जि. रायगडा, राज्य ओडीशा (फरार) आरोपी क्र १ यास दि १.३.२०२३ रोजी व आरोपी क्र.२ यास दि.३.३.२०१३ रोजी अटक

गुन्हयातील जप्त मुद्देमाल

१) २०,४०,०००/- रु. किंमतीचा १०२ किलो वाळलेला गांजा

२) ५,००,०००/- रु. किंमतीची पांढऱ्या रंगाची मारूती इटिंगा चार चाकी गाडी
३) ३,५०,०००/- रु. किंमतीची रिओ प्रिमीअर चार चाकी गाडी
असा एकुण २८,९०,०००/- रु (अठठावीस लाख नव्वद हजार रु.) किंमतीचा मुद्देमाल जप्तहकीकत.

मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांनी आढावा बैठकीमध्ये सांगली जिल्हयातील गांजा विक्री व तस्करी करणारे इसमाचा शोध घेऊन त्यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना सुचना दिल्या होत्या.

वरीलप्रमाणे नमुद पथकाने पोकों आर्यन देशिंगकर यांना मिळाले माहितीवरुन, कवठेपिरान ते सर्वोदय कारखाना जाणारे रोडवर असले बाबासो चव्हाण यांचे शेता मध्ये इसम नामे
१. अदिल नासीर शहापुरे, वय ३३, रा. बाबर गल्ली, कोल्हापूर रोड, सांगली
२. सचिन बाबासो चव्हाण, वय ३१, रा. जि.प.शाळेजवळ, कवठेपिराण ता. मिरज, जि. सांगली.
३. मयुर सुभाष कोळी, वय ३३, रा. १०० फुटी रोड, डी मार्टच्या पाठीमागे, सांगली
४. मतीन रफिक पठाण, वय ३२, रा. काटकर गिरणी समोर, राधाकृष्ण वसाहत, सांगली हे त्यांचेकडील गांजा अंमली पदार्थ बिक्री करीता घेवुन आले असता छापा मारुन ताब्यात घेतले होते. नमुद आरोपी कडुन २०,४०,०००/- रु. किंमतीचा २०२ किलो वाळलेला गांजा व गुन्हयात वापरलेली चाहने असा एकुण २८,९०,०००/- रु (अठठावीस लाख नव्वद हजार रु.) किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुरंन ७२ /२०२३ गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयातील १०२ किलो वाळलेला गांजा मुद्देमाल हा ओडीशा राज्य येथून आणल्याचे व यातील फरार आरोपी ओडीशा राज्य येथे असल्याने नमुद गुन्हयाची व्याप्ती ओडीशा राज्यापर्यंत असल्याने मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांनी गुन्हयाचा तपास वेगवान व सखोल व्हावा यासाठी गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांचेकडे वर्ग करून पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था.गु.अ. शाखा सांगली यांना सुचना दिल्या होत्या.

गुन्हयाचा तपास योग्य व वेगवान होण्यासाठी पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी मार्गदर्शक सुचना देऊन गुन्हयाचे तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांचे पथक तयार करुन ओडीशा राज्य, जिल्हा गजपती येथे रवाना केले होते. नमुद पथकाने तात्काळ तपासाची सूत्रे फिरवून ता. मोहाना, जि. गजपती, राज्य ओडीशा येथे जाऊन यातील फरार आरोपी कुमार प्रभा लिमा ऊर्फ राजु भाई, राज्य ओडीशा याचा शोध सुरु केला. यातील फरार आरोपी हे अतिशय दुर्गम अशा जंगल भागात लपुन बसल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ सदर ठिकाणी छापा मारुन सदर गांजा मुद्देमाल पुरवठा करणारा व आरोपी कुमार प्रभा लिमा ऊर्फ राजु भाई याचा साथीदार संजीब पत्रिक बेहरा, वय-२७, रा. किर्तीकी, पोस्ट पिंडीकी, जि. गजपती, राज्य ओडीशा यास पथकाने शिताफीने पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. आरोपी संजीव पत्रिक चेहरा यास मा. न्यायदंडाधिकारी, कोर्ट मोहाना, जि. गजपती, ओडीशा राज्य यांचे समक्ष हजर करून त्याची ट्रांझीट रिमांड घेऊन पुढील तपासकामी सांगली येथे घेऊन आले आहे. नमुद अटक आरोपीकडे सखोल तपास केला असता, नमुद आरोपी यांनी यापुर्वी ओडीशा राज्यातुन सांगली आणलेल्या गांजा मुद्देमालापैकी गांजा माल मिरज मधील गुरुजी ऊर्फ हुसेन मैनुद्दीन मुल्ला यास विक्री करण्यास दिले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने नमुद पथकाने यापूर्वी गांजा तस्करी गुन्हे दाखल असलेला आरोपी नामे गुरुजी ऊर्फ हुसेन मैनुद्दीन मुल्ला यास सदर गुन्हयाचे तपास कामी ताब्यात घेतले आहे.

आरोपी नामे संजीब पत्रिक बेहरा, ओडीशा राज्य यास मा. न्यायालय सांगली याचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालय यांनी आरोपीस ०५ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. आरोपी नामे गुरुजी ऊर्फ हुसेन मैनुद्दीन मुल्ला, मिरज यास मा. न्यायालय सांगली याचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालय यांनी आरोपीस ०९ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली करीत आहे.

आरोपी नामे गुरुजी ऊर्फ हुसेन मैनुद्दीन मुल्ला, मिरज हा गांजा विक्री व तस्करी मधील रेकॉर्डवरील आरोपी असुन

त्याचेवर यापुर्वी मिरज शहर पोलीस ठाणे व महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट