नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.बी.जी.शेखर पाटील यांचे हस्ते नंदुरबार येथे कोकणी हिल पोलीस चौकीचे भूमीपूजन

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नंदुरबार :- नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील दिनांक 02/03/2023 रोजी पावेतो नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासण 36 ये आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर पोलीस ठाणे अंतर्गत दुधाळे शिवारातील कोकणी हिल येथे पोल… चौकीचे भूमीपूजन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील कोकणी हिल ही दुधाळे शिवारातील वसाहत परिसर असून चोरीच्या घटनांमध्ये मागील काही दिवसापासून वाढ झालेली आहे. तसेच येथे किरकोळ कारणावरून बऱ्याचवेळा छोटेमोठे वाद होत असतात. या सर्व गोष्टींचा त्रास वयोवृध्द महिला शाळेत जाणारे विद्यार्थी, व्यावसायीक व सामान्य नागरिकांना होत होता. त्यामुळे कोकणी हिल परिसरातील नागरिकांनी याबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना समक्ष भेटून त्यांना होणान्या त्रासाबाबत सविस्तर माहिती दिली होती.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी या सर्व बाबींचा आढावा घेवून कोकणी हिल परिसरात पोलीस चौकी उभारणीबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना सांगितले. त्याप्रमाणे नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर कोकणी हिल पोलीस चौकी उभारणीबाबत कारवाई करत कोकणी हिल परिसरातील शंकर हरी नगरमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत पोलीस चौकी बाबत ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामस्थ यांचेशी चर्चा करुन पोलीस चौकी बाबत प्रस्ताव नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना सादर केला. त्यांनी देखील त्यावर तात्काळ कारवाई करत पोलीस चौकी उभारणीसाठी परवानगी दिली.

त्यानुसार कोकणी हिल परिसरातील शंकर हरी नगरमधील 3873 स्के.फु भूखंडचा 8-अ चा उतारा ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामस्थ यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडे सुपूर्त करुन आज दिनांक 01/03/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर पोलीस ठाणे अंतर्गत दुधाळे शिवारातील शंकर हरी नगरमध्ये कोकणी हिल येथे पोलीस चौकीच्या जागेचे धार्मीक विधी व परंपरेनुसार पूजा करुन पोलीस चौकी बांधकामाचे भूमीपूजन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील यांचे हस्ते करण्यात आले. नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीसांची असते आणि पोलीसांना नागरिकांच्यासहकार्याची गरज असते. लोखसंख्या वाढल्यामुळे नवीन वसाहती देखील वाढलेल्या आहेत त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले असून नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलीस चौकीमुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे असे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री बी. जी. शेखर पाटील यांनी यावेळी सांगितले. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल व लोक सहभागातून पोलीस चौकी उभारणीबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ. श्री. बी.जी.शेखर पाटील यांनी भूमीपूजनप्रसंगी दुधाळे गावाचे सरपंच श्रीमती अश्विनी मालचे ग्रामसेवक श्री. दौलत कोकणी, पंचायत समिती सभापती श्रीमती छाया मालचे, प्रतिष्ठीत नागरिक श्री. ताराचंद मालचे व सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले.

तसेच कोकणी हिल परिसरात जास्तीत जास्त शासकीय कर्मचारी राहात असल्यामुळे सुट्टयांमध्ये शासकीय कर्मचारी आपल्या गावी जात असतात. त्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असते. कोकणी हिल पोलीस चौकीमुळे नागरिकांना वेळीच मदत होवून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात मदत होईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध करुन दातृत्व दाखविल्याबद्दल समस्त दुधाळे शिवारातील नागरिक, ग्रामसेवक, सरपंच व इतर मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

कोकणी हिल परिसरात पोलीस चौकीचे भूमीपूजन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे

वातावरण असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सदर कार्यक्रमाच्या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पंचायत समिती सभापती श्रीमती छाया मालचं, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमलदार उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट