पोलिस दलातर्फे जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी अभियान राबविणार विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नंदुरबार :- नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे अंमली पदार्थविरोधी अभियान सुरू करण्यात आले असून त्याचा शुभारंभ नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जनजागृती मोहीम राबविताना जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, संस्था इत्यादी ठिकाणी जनजागृती म्हणून निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सायकल रॅली, भाषण स्पर्धा, पथनाट्य आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. तसेच त्याचप्रमाणे तरुण वयोगटातील विद्यार्थी व पालक यांचे एकत्रित चर्चासत्र / संवादसत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.

पोलिस महानिरीक्षक पाटील यांनी केलेल्या आवाहनास २४ तासाचे आत प्रतिसाद म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी हे अभियान सुरू केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात हा कार्यक्रम झाला. पी. आर. पाटील यांनी अमली पदार्थाचे दुष्परिणाम व किशोरवयात या गोष्टी मुलांना समजावून सांगितल्यास त्याचे काय फायदे होतात, याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थितांना अमली पदार्थविरोधी संकल्पनेची शपथ दिली. व शिक्षक उपस्थित होते.

पोलिस अधिकारी म्हणून काम करीत असताना अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या तरुणांना त्यातून बाहेर काढून नवीन जीवन मिळवून दिल्याचे उदाहरण विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी दिले. तरुण पिढ़ी है राष्ट्राचे भविष्य असून त्यांनी उज्वल भविष्यासाठी व स्वतःच्या वैयक्तिक आरोग्यासाठी अमली पदार्थ सेवन करण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले.

अमली पदार्थविरोधी अभियानाच्या या कार्यक्रमाप्रसंगी पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, जी. टी. पी. महाविद्यालय, श्रॉफ हायस्कूल, एस. ए. मिशन हायस्कूल, भामरे क्लासेस, अभिनव विद्यालय, पी. जी. पब्लिक स्कूल या शाळा व महाविद्यालयांचे सुमारे एक हजार विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक, प्राचार्य

कार्यक्रमासाठी अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस निरीक्षक राहुल पवार, रवींद्र कळमकर, दिनेश भदाणे तसेच नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व अमलदार उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट