महाड एमआयडीसी लक्ष्मी ऑरगॅनिक युनिट टू कंपनीत चोरी करणाऱ्या २ आरोपीस ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

प्रतिनिधी-राकेश देशमुख

महाड: महाड एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 3 मार्च 2023 रोजी लक्ष्मी ऑरगॅनिक्स युनिट टू कंपनीतील चोरी प्रकरणी दोन आरोपींना महाड एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

आरोपी गणेश शंकर सावंत रा. ढालकाठी, मूळ रा. माझेरी व अजय अनुप शर्मा रा.आसंनपोई, मूळ रा. उत्तर प्रदेश अशा दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 12 क्लोरीन टनर कोपर कॅप्स असा 2400 रुपयांचा चोरीचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सदर चोरीची घटना ही सीसीटीव्हीमुळे कंपनी प्रशासनाच्या लक्षात आली. रीशु अश्विनी शर्मा यांच्या फिर्यादीनुसार महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दोन आरोपींनी विरोधात भादवीस कलम 379,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद पवार हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट