घोलवड पोलीस ठाणे येथे दाखल बालकावरील लैंगिक अत्याचार गुन्हयातील आरोपीस २० वर्षे कारावासाची शिक्षा…

उपसंपादक – रणजित मस्के
पालघर : घोलवड पोलीस ठाणे गु.र.नं. ४८/२०१९ भा.द.वि.स कलम ३७६, (३) सह पोक्सो कायदा कलम ४ व ६ प्रमाणे दाखल गुन्ह्यामधील आरोपी मधू उर्फ मधुकर लहानु बरफ वय ४८ वर्षे रा. भिणारी नागणकस, ता. डहाणु, जि. पालघर याने यातील फिर्यादी हि अल्पवयीन आहे हे माहित असताना तीचेवर लैंगिक अत्याचार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे अन्वेषण सपोनि / प्रकाश सोनवणे, तत्कालीन नेमणूक घोलवड पोलीस ठाणे यांनी करुन आरोपीविरुध्द कौशल्यपूर्ण सबळ पुरावा गोळा करून मा. अतिरीक्त सत्र न्यायालय, पालघर येथे दोषारोपपत्र सादर केले होते. आरोपीविरुध्द अपराध केल्याचा पुरावा शाबीत झाल्याने मा. श्री. डॉ. मकरंद देशपांडे, अतिरीक्त सत्र न्यायालय पालघर यांनी आरोपी यास २० वर्षे तुरूंगवास व ५००० रुपये दंडाची शिक्षा दि.२८/०२ / २०२३ रोजी सुनावली आहे. सदर गुन्हयात सरकारी वकील म्हणून श्री. एस. बी. सावंत, तपासी अंमलदार म्हणुन सपोनि / प्रकाश सोनवणे, तत्कालीन नेमणूक घोलवड पोलीस ठाणे व कोर्ट पैरवी म्हणुन सफौ / डी. एन. निकम यांनी कामकाज पाहिले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com