पिंपरी चिंचवड येथे अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेने गांजा बाळगणाऱ्या आरोपीस केली अटक…

प्रतिनिधी-राकेश देशमुख

पिंपरीचिंचवड : अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी अंमलदार शिरगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलिस उपनिरीक्षक राजन महाडीक व पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून आज दि. २८/०२/२०२३ रोजी १६.३५ वा.चे सुमारास शिरगाव पोलीस स्टेशनचे हद्दीत पवना नदीच्या कडेला, तळेगाव पंप हाऊस शेजारी सोमाटणे गावठाण तळेगाव दाभाडे ता. मावळ जि.पुणे इसम नामे प्रविण रमेश शेडगे वय ३० वर्षे रा. घर नं.११४/ए सोमाटणे गावठाण, तळेगाव ता.मावळ जि.पुणे यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन एकुण १,००,७५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये ०४ किलो ०३० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने बेकायदेशीररीत्या कब्जात बाळगताना मिळुन आला आहे. म्हणून त्याचे विरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क) २०(ब)(ii)(ब) २९ प्रमाणे शिरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी माहिती रामदास इंगवले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार अंमली पदार्थ विरोधी पथक व दरोडा विरोधी पथक
गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com