नंदुरबार जिल्ह्यात कॉपी पुरविणाऱ्या आठ + जणांवर गुन्हा दाखल…
उपसंपादक -रणजित मस्के
नंदुरबार – परिक्षा केंद्र परिसरात कॉपी पुरविण्यासाठी फिरणाऱ्या आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परिक्षा सुरु आहे. या परिक्षेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शाळांमध्ये परिक्षा केंद्र निश्चित करण्यात आले असून परिक्षा कालावधीत जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश जारी केला आहे. मनाई आदेश असतांना परिक्षा केंद्र परिसरात कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे शंकर वाश्या गावित, राजेंद्र अनिल गावित, खांडबारा येथे राहुल सुदाम वसावे, विशाल दिलीप वळवी नंदुरबार शहरात मोहित गणेश खेडकर धानोरा येथे गणेश रोहिदास वळवी, प्रकाश रविंद्र वळवी खोंडामळी येथे मिहीर विश्वनाथ पटेल या आठ जणांविरुध्द कॉपी पुरविण्याचा उद्देशाने फिरतांना मिळून आल्याप्रकरणी भादंवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com